4k समाचार दि. 23
तनाएराचे नवेफेस्टिव्ह कलेक्शन ‘मियारा’विशेष ऑफर्सआणि अनोखी खरेदीयोजना ग्राहकांना मिळवूनदेणार स्वप्नपूर्तीचा आनंद नवी मुंबई/ पनवेल (प्रतिनिधी) महिलांचा एथनिक वेयर ब्रँड आणि टाटा परिवारातील एक सदस्य, तनाएराने प्रस्तुत केले आहे नवे फेस्टिव्ह कलेक्शन ‘मियारा’ हाताने विणलेले आणि शुद्धतेमध्ये रुजलेले हे कलेक्शन आधुनिक महिलांसाठी तयार केले आहे. आधुनिक डिझाईन आणि पारंपरिक कला यांच्या अप्रतिम विणीतून एक आगळीवेगळी डिझाईन भाषा तयार होते जी या कलेक्शनला इतरांपेक्षा वेगळे स्थान प्रदान करते. विविध प्रकारचे रेशीम आणि सूत, विविध विणकाम परंपरा ‘मियारा’ मध्ये पाहायला मिळतात. स्वतःची आवड, स्वप्ने पूर्ण करण्यासाठी असो किंवा एखाद्या प्रिय व्यक्तीला विचारपूर्वक दिलेली भेट असो, आनंद आणि उत्साहाचा प्रत्येक क्षण शानदार व संस्मरणीय बनावा ही यामागची भावना आहे.

वर्षातील सर्वात मोठे सण जवळ येत आहेत, त्यांना अनुसरून तनाएराने आपले नवे कॅम्पेन देखील तयार केले आहे, ‘द गिफ्ट ऑफ प्युअर लव्ह’, सणासुदीच्या काळात साडी म्हणजे कालातीत प्रेमाचे प्रतीक असा साडीचा सन्मान या कॅम्पेनमध्ये करण्यात आला आहे. प्रत्येक खरेदी हा एक अनुभव बनावा आणि तो कायम स्मरणात राहावा यासाठी ब्रँडने विशेष फेस्टिव्ह ऑफर्स सुरु केल्या आहेत, यामध्ये गिफ्ट व्हाउचर्स आणि गोल्ड कॉईन्स आहेत. मर्यादित कालावधीच्या या ऑफरचा लाभ २० ऑक्टोबर २०२५ पर्यंत घेता येईल. देणे ही केवळ घटना बनून राहू नये, यासाठी तनाएराने आपली गोल्डन ककून खरेदी योजना सुरु केली आहे, त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या स्वप्नातील साडी प्रत्यक्षात परिधान करण्याचे सुख मिळवता येते. तनाएराचे सीईओ श्री अंबुज नारायण म्हणाले, “यंदाच्या सीझनसाठी आम्ही प्रस्तुत केलेले मियारा कलेक्शन हे कल्पनेचे आणि वैविध्यपूर्ण विणकामातून प्रदर्शित होणाऱ्या वारशाचे प्रतिबिंब आहे. तनाएरामध्ये आम्ही असे मानतो की, साडी ही फक्त परिधान केली जात नाही तर अनुभवली जाते. साडी कोणत्याही सोहळ्याला तुमचा स्वतःचा समारंभ बनवते, तुमच्या भेटवस्तूंना शुद्ध प्रेमाचे प्रतीक बनवते. हीच भावना आम्ही आमच्या फेस्टिव्ह कॅम्पेनमधून मांडली आहे.
