नवीन बातम्या
ॐ श्री साई राम पदयात्रा मंडळ उरण तर्फे उरण ते शिर्डी पदयात्रा
स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या रायगड जिल्ह्यात संघटनात्मक नियुक्त्या
नैना प्रकल्पग्रस्तांचा १३ वर्षांचा संघर्ष; शेतकऱ्यांना न्याय कधी मिळणार?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन; प्रलंबित प्रश्नांवर लवकरच बैठक घेण्याचे आश्वासन
जय माताजी महिला भजन मंडळाकडून गो-रक्षण संस्थेला ५५ हजारांची देणगी
राहुल शिवाजी बनसोडे यांचा ‘बनसोडे एंटरप्रायजेस’च्या माध्यमातून बौद्ध वस्तूंचा व्यवसाय
बुद्धमूर्तींपासून धम्मसाहित्यापर्यंत विविध वस्तू उपलब्ध; सांगली आणि नवी मुंबईत व्यवसायाचा विस्तार
पनवेलमध्ये राज्यस्तरीय जलसा गीत गायन स्पर्धा; सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा गुणगौरव सोहळा सह्याद्री संस्थेतर्फे आतिष साळवी  आणी नंदकुमार कांबळे यांच्या हस्ते  श्री. राहुल शिवाजी बनसोडे यांचा गुणगौरव पुरस्कार देऊन गौरव
‘स्मृती दिनविशेष राज्यस्तरीय पुरस्कार २०२६’ सोहळा उत्साहात नंदकुमार कांबळे यांच्या हस्ते राहुल शिवाजी बनसोडे यांना सन्मानचिन्ह प्रदान
नैना क्षेत्रात १५ लाख रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट; भूमिपुत्रांना प्राधान्य!
राष्ट्र प्रथम’ विचार सर्वदूर पोहोचविण्याची गरज
महापौर नितीन पाटील यांचे प्रतिपादन; ‘शिक्षणाचे डोही आनंद तरंग’ दिवाळी अंकाचे प्रकाशन

आमदार प्रशांत ठाकूर यांची महावितरण कार्यालयात धडक
खंडित वीजपुरवठ्याबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारत व्यक्त केली नाराजी



4kNews कामोठे दि 8
पनवेल (प्रतिनिधी) कामोठेसह पनवेल परिसरातील विविध भागांमध्ये सातत्याने होत असलेल्या वीजपुरवठा खंडित होण्याच्या गंभीर समस्येमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा आमदार प्रशांत ठाकूर यांनी रविवारी (दि.७) थेट भिंगारी येथील महावितरण कार्यालयात धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी त्यांनी कार्यकारी अभियंत्यांसोबत सविस्तर चर्चा करून वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.


पनवेल, कामोठे तसेच आसपासच्या परिसरात नियमितपणे वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक, व्यापारी आणि विद्यार्थीवर्गाला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी निदर्शनास आणून दिले. महावितरणकडून या समस्येकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सूचना दिल्या. वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी तातडीने आणि प्रभावी उपाययोजना राबविण्यात याव्यात, अशी मागणी त्यांनी केली तसेच नागरिकांना वारंवार होणाऱ्या त्रासातून दिलासा मिळावा यासाठी आवश्यक तांत्रिक सुधारणा आणि देखभाल कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही दिले.
यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी इशारा देताना सांगितले की, महावितरणचा निष्काळजीपणा आणि दुर्लक्षपणा यापुढे खपवून घेतला जाणार नाही. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी त्वरित पावले उचलली नाहीत, तर जनआंदोलन छेडले जाईल तसेच महावितरणचा असाच ढिसाळ कारभार सुरू राहिल्यास संबंधित कार्यालयाला टाळे ठोकण्यात येईल.


या प्रसंगी भाजपचे कामोठे मंडळ अध्यक्ष व नगरसेवक विकास घरत, नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, प्रदीप भगत, रवींद्र जोशी तसेच दामोदर चव्हाण व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या या महत्त्वाच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे महावितरण प्रशासनावर दबाव वाढला असून आगामी काळात वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी कोणती पावले उचलली जातात याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top