नवीन बातम्या
महेंद्रशेठ घरत सच्चा मनाचा माणूस : हर्षवर्धन सपकाळ
काँग्रेस तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे यांचा सपत्नीक सत्कार
उरणमध्ये ‘खान्देश महोत्सव २०२६’ उत्साहात संपन्न
विंधणे कोळीवाड्यात ‘एकविरा आई प्रसन्न’ मच्छीमार सहकारी संस्थेची स्थापना
सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पनवेल शहरात पोलिसांचा रूट मार्च
अटल सेतूवरून विघ्नहर्ताची दिमाखदार स्वारी
भव्य महाआगमनाने कामोठे झाले ‘विघ्नहर्तामय’
माँसाहेब ठाकरे स्मृतिदिनानिमित्त तळोज्यात आयुष्मान-आभा कार्ड शिबिर
कळंबोलीकर तहानले; सिडकोविरोधात शिवसेना आक्रमक
राष्ट्रीय संशोधन स्पर्धेत सी.के.टी. महाविद्यालयाला द्वितीय क्रमांक
इनर व्हील क्लब ऑफ पनवेल. डिस्ट्रिक्ट ३१३; सीमेवरील जवानांसोबत रक्षाबंधन

बदलत्या काळातील पालकत्व”  या विषयावर बालरोग संघटनेतर्फे पालक शिक्षकांकरिता विशेष चर्चा सत्र

4kNews कामोठे दि. 8
पनवेल (प्रतिनिधी) हल्ली झालेले शहरीकरण, औद्योगीकरण, जीवघेणी स्पर्धा, समाज माध्यमांचा किशोरवयीन मुलांवर होणारा वाढता प्रभाव, त्याचे मुलांवर होणारे गंभीर दुष्परिणाम, मुलांमधील वाढलेली व्यसनाधीनता, वाढलेल्या वर्तन समस्या व हिंसाचार यामुळे पालक वर्ग थोडासा भांबावलेला आहे. या समस्या लक्षात घेऊन रायगड बालरोग संघटनेमार्फत “बदलत्या काळातील पालकत्व” या ज्वलंत, जिव्हाळ्याच्या आणि महत्त्वाच्या विषयावर शनिवार दि. 13 जून 2026 या दिवशी स. 11 ते 1 या दरम्यान एक विशेष परिसंवाद व चर्चासत्र आयोजित केले असून हे चर्चासत्र आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह या ठिकाणी होणार आहे. 


या चर्चासत्राचे सूत्रसंचालन प्रसिद्ध बालरोग तज्ञ, संवादक, वक्ते व लेखक डॉ. अमोल अन्नदाते करणार असून यात डॉ निशिकांत कोतवाल (नागपूर), डॉ. जयंत पांढरीकर (अमरावती) डॉ चंद्रशेखर दाभाडकर (महाड) डॉ सुचित तांबोळी (अहिल्यानगर) व डॉ. नीलिमा भांडारकर (पनवेल) हे या विषयातील तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. परिसंवादानंतर ते शंका समाधान ही करणार आहेत. या चर्चासत्रात सर्व पालक व शिक्षकांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे असे आवाहन अधिवेशनाच्या मुख्य संयोजिका डॉ. चित्रा कुलकर्णी व या कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. जय भांडारकर  (88501 53158) यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top