नवीन बातम्या
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त नविन पनवेल भाजप मंडलाचे रक्तदान शिबिर उत्साहात
Open Channels FM: Our Guide to Open Channels FM Podcast Network’s Channels, Series, and Blog
पनवेल कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पदी देवेंद्र गंगाराम मढवी यांची  बिनविरोध निवड.
हिंदू देवी-देवतांचा अवमान केल्याचा कांबळे कुटुंबावरील आरोप खोटा; तळोजा वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण भगत यांचे स्पष्टीकरण
शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा; कर्जमाफीमुळे बळीराजाला मोठा दिलासा – नामदार ॲड. आशिष शेलार
रायगड जिल्हा किसान मोर्चातर्फे पनवेलमध्ये ‘कृतज्ञता मेळावा’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानले आभार
सन्माननीय रिपाइं नेते नरेंद्र गायकवाड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जुलै २०२६ संपूर्ण महिनाभर विविध कार्यक्रम हाती घेण्यात आले
लोकप्रतिनिधींच्या पत्रांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
नगरसेवक प्रथमेश सोमण प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर बरसले!
फिजिबिलिटी अहवालासाठी 50 हजारांची लाच; महावितरणचा सहायक अभियंता एसीबीच्या जाळ्यात
पनवेल महानगरपालिकेच्या निष्काळजी आणि बेजबाबदार कारभाराचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने केला संताप व्यक्त

पनवेल तालुका पत्रकार प्रेस क्लब च्या अध्यक्षयपदी प्रशांत शेडगे यांची एकमताने निवड


पनवेल (प्रतिनिधी) पनवेल गेस्ट हाऊस येथे रायगड जिल्हा प्रेस क्लब च्या अंतर्गत पनवेल तालुका पत्रकार प्रेस क्लब ची कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून अध्यक्षपदी पत्रकार प्रशांत शेडगे यांची एकमताने निवड करण्यात आली.


मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली परिषदेचे अध्यक्ष मिलिंद आष्टीकर आणि रायगड प्रेस क्लब चे अध्यक्ष मनोज खांबे व विजय मोकल तसेच अनिल भोळे यांच्या उपस्थित पनवेल तालुका पत्रकार प्रेस क्लब ची स्थापना करण्यात आली.

या मद्धे उपाध्यक्ष तृप्ती पालकर,सरचिटणीस हरेश साठे,कार्यध्यक्ष राजेंद्र पाटील आणि खजिनदार म्हणून दत्तात्रय कुलकर्णी,सल्लागार नितीन देशमुख यांची निवड करण्यात आली.त्याच बरोबर पनवेल तालुका पत्रकार प्रेस क्लब चे सदस्य जेष्ठ पत्रकार गणेश कोळी,संजय कदम,राकेश पितळे, सुमन नलावडे ,नितीन कोळी,सचिन भोळे, रायगड प्रेस क्लब चे विश्वस्त विजय मोकल आणि अनिल भोळे  उपस्थित होते.

या वेळी पनवेल तालुका पत्रकार प्रेस क्लब चे अध्यक्ष प्रशांत शेडगे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की पत्रकार संघटनेच्या माध्यमातून सातत्याने सामाजिक उपक्रम राबवून समाजामध्ये आदर्श निर्माण करू तसेच जास्तीत जास्त तळागाळातील घटकांपर्यंत पोहचून गरजवंतांना मदतीचा हात देऊ.अध्यक्षपदी शेडगे यांची निवड झाल्यावर समाजातील सर्व स्थरातून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.पनवेल शहर जुने भाजी मार्केट व्यापारी संघटनेचे अध्यक्ष कमलाकर मुंडकर
आणि उपाध्यक्ष सोमनाथ इचके यांच्या सह सर्व व्यापारी वर्गाने अध्यक्ष प्रशांत शेडगे यांचं पुष्पगुछ देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top