नवीन बातम्या
आदर्श सरपंच सौ. निकिता संदीप पाटील यांचा ‘सह्याद्रीरत्न गुणवौरव सन्मान २०२६’ ने गौरव
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य जनआरोग्य शिबिर; लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

इनरव्हील क्लब ऑफ पनवेलची दैदिप्यमान कामगिरी; तब्बल १० बक्षिसांचा मान
पॅरा गेम्स आणि आशियाई पॅरा गेम्ससाठी भारतीय पॅरा-खेळाडूंना मिळणार एसबीआय लाईफचे बळ
लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेलमध्ये “ऋतू हिरवा” अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन
पनवेल शहर पोलिसांची मोठी कारवाई; बनावट कागदपत्रांच्या आधारे २.२९ कोटींची जमीन फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
मानवता फाउंडेशनतर्फे दुर्गम भागातील गरजू विद्यार्थ्यांना छत्री वाटप; वृक्षारोपणातून निसर्ग संवर्धनाचा संदेश
*वर्षावास निमित्त धम्म बांधवांची गृह भेट उपक्रम*
पनवेलच्या विकास आराखड्याला गती; नगररचना संचालकांसोबत महत्त्वपूर्ण बैठक

पॅरा गेम्स आणि आशियाई पॅरा गेम्ससाठी भारतीय पॅरा-खेळाडूंना मिळणार एसबीआय लाईफचे बळ


4kNews कामोठे दि. 2
नवी मुंबई (प्रतिनिधी) भारतातील अग्रगण्य खासगी जीवन विमा कंपन्यांपैकी एक असलेल्या एसबीआय लाईफ इन्शुरन्सने २०२६ च्या पॅरा स्पोर्ट्स सीझनसाठी भारतीय पथकाचे ‘प्रिन्सिपल पार्टनर’ म्हणून पॅरालिम्पिक समिती ऑफ इंडिया (पीसीआय) सोबतची भागीदारी अधिक दृढ करण्याची घोषणा केली आहे. या कराराअंतर्गत ग्लासगो येथे होणाऱ्या कॉमनवेल्थ पॅरा गेम्स २०२६ तसेच जपानमधील आयची-नागोया येथे होणाऱ्या आशियाई पॅरा गेम्स २०२६मध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय पथकासाठी एसबीआय लाईफ ‘ऑफिशियल लाईफ इन्शुरन्स पार्टनर’ म्हणून कार्य करणार आहे.



पॅरिस २०२४ पॅरालिम्पिक स्पर्धेदरम्यान सुरू झालेल्या यशस्वी सहकार्याचा विस्तार करत एसबीआय लाईफने भारतातील पॅरा-खेळाडूंच्या जिद्द, मेहनत आणि उत्कृष्टतेच्या प्रवासाला पाठबळ देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. या भागीदारीद्वारे देशातील पॅरा-खेळाडूंच्या यशोगाथा अधिक व्यापक स्तरावर पोहोचवण्याबरोबरच व्यक्तींना आत्मविश्वासाने आपल्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी प्रेरित करण्याचा कंपनीचा उद्देश आहे.एसबीआय लाईफ इन्शुरन्सचे ब्रँड, कॉर्पोरेट कम्युनिकेशन आणि सीएसआर प्रमुख रविंद्र शर्मा म्हणाले, “आत्मविश्वास व्यक्तींना आयुष्यातील अनिश्चिततेला सामोरे जाण्यास आणि स्वतःची स्वप्ने साकार करण्यास सक्षम करतो. ‘अपने लिए, अपनों के लिए’ या आमच्या ब्रँड तत्त्वज्ञानाशी सुसंगत अशी ही भागीदारी आहे. भारतीय पॅरा-खेळाडू जिद्द, पूर्वतयारी आणि चिकाटीचे सर्वोत्तम उदाहरण आहेत. त्यांच्या यशस्वी प्रवासाला पाठबळ देताना आम्हाला अभिमान वाटतो. ही भागीदारी केवळ क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्टतेला नव्हे, तर व्यक्ती आणि कुटुंबांना भविष्यासाठी आत्मविश्वासाने तयार राहण्याच्या आमच्या वचनबद्धतेलाही अधोरेखित करते.



पॅरालिम्पिक समिती ऑफ इंडियाचे अध्यक्ष तसेच पद्मभूषण, पद्मश्री, मेजर ध्यानचंद खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार विजेते देवेंद्र झाझरिया यांनी सांगितले की, “२०२६ च्या पॅरा स्पोर्ट्स सीझनसाठी एसबीआय लाईफ भारतीय संघाचे प्रिन्सिपल पार्टनर म्हणून पुन्हा आमच्यासोबत जोडले जात असल्याचा आनंद आहे. पॅरिस २०२४ पॅरालिम्पिकमध्ये भारताने २९ पदकांची ऐतिहासिक कामगिरी केली होती आणि त्या प्रवासात एसबीआय लाईफ आमच्या पाठीशी होते. 

अशा कॉर्पोरेट भागीदारीमुळे पॅरा-खेळाडूंना केवळ त्यांच्या कामगिरीवर लक्ष केंद्रित करता येते. कॉमनवेल्थ आणि आशियाई पॅरा गेम्समध्ये भारताला आणखी मोठे यश मिळवून देण्यासाठी ही भागीदारी निश्चितच प्रेरणादायी ठरेल.”कॉमनवेल्थ पॅरा गेम्स २०२६ आणि आशियाई पॅरा गेम्स २०२६साठी भारतीय पॅरा-खेळाडू तयारी करत असताना एसबीआय लाईफ त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे. आत्मविश्वास, पूर्वतयारी आणि सक्षम पाठबळाच्या बळावर प्रत्येक व्यक्ती असाधारण यश संपादन करू शकते, हा संदेश या भागीदारीतून अधोरेखित करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top