मुंबई(4k समाचार)नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला भूमिपुत्रांचे जननायक लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, अशी ठाम मागणी पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्थेच्या पत्रकारांनी केली आहे. यासाठी संस्थेच्या प्रतिनिधींनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांची बुधवारी (२४ सप्टेंबर) मुंबईतील नंदगिरी गेस्ट हाऊस येथे भेट घेतली व निवेदन सादर केले.
पत्रकारांनी या वेळी स्पष्ट केले की विमानतळाचे नामकरण हा केवळ औपचारिक वा प्रशासकीय विषय नसून स्थानिक भूमिपुत्रांच्या भावनांचा व हक्कांचा प्रश्न आहे. दि.बा. पाटील यांनी भूमिपुत्रांच्या न्यायासाठी आयुष्यभर लढा दिला असून त्यांचे नाव विमानतळाला मिळणे ही खरी आदरांजली ठरेल, असे त्यांनी सांगितले.
ही मागणी ऐकल्यानंतर ना. आठवले यांनी तातडीने केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांच्याशी दूरध्वनीवर संवाद साधला. उद्घाटनापूर्वीच या मागणीवर गांभीर्याने विचार व्हावा, यासाठी ते स्वतः पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.
मुंबई(4k समाचार)नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला भूमिपुत्रांचे जननायक लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, अशी ठाम मागणी पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्थेच्या पत्रकारांनी केली आहे. यासाठी संस्थेच्या प्रतिनिधींनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांची बुधवारी (२४ सप्टेंबर) मुंबईतील नंदगिरी गेस्ट हाऊस येथे भेट घेतली व निवेदन सादर केले.
या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार विजय कडू, सय्यद अकबर, निलेश सोनावणे, विवेक पाटील, संजय कदम, केवल महाडिक, शंकर वायदंडे, गौरव जाहगीरदार, लालचंद यादव, गणपत वारगडा, चंद्रकांत शिर्के, शैलेश चव्हाण, विशाल सावंत, भूषण साळुंके, दीपक घरत, राम बोरीले आदी पत्रकार उपस्थित होते.