विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर मनसेला ठाणे-पालघर जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. मनसे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत राज ठाकरेंना पत्र लिहून त्यांनी ही माहिती दिली. जाधव यांनी पत्रात नमूद केले की, “पराभवाची जबाबदारी घेत मी राजीनामा देत आहे.

काम करताना कळत-नकळत झालेल्या चुकांसाठी क्षमस्व.” त्यांच्या राजीनाम्यामुळे मनसेसाठी ठाणे-पालघर जिल्ह्यात अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
