नवीन बातम्या
साईनगर परिसरात उभारलेल्या पोलीस मदत केंद्राचा लाभ विभागातील नागरिकांना होणार
पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या माध्यमातून ग्रीन पोलीस स्टेशन उपक्रमांतर्गत परिसरात वृक्षारोपण
पनवेल तालुका पोलिसांनी केली दंगा काबू योजनेची रंगीत तालीम
रेल्वेची धडक लागून अज्ञात इसमाचा मृत्यू ; पनवेल तालुका पोलिसांच्यामार्फत नातेवाईकांचा शोध सुरू
‘रयत’तर्फे लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा शनिवारी हृद्य सत्कार‘
गामी बिल्डरच्या बांधकामामुळे पिसार्वे गावाचा नैसर्गिक नाला धोक्यात; माजी सरपंच नंदकुमार म्हात्रे यांचा इशारा
पनवेल एस.टी. डेपो परिसरात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या साठवणूक आणि विक्रीप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल, वाहन जप्त !
विजेच्या समस्येसंदर्भात महाविकास आघाडीच्या नगरसेवकांची वीज वितरण कार्यालयाला धडक
गेल्या दोन महिन्यांपासून महिलेची हत्या करून पसार असलेल्या आरोपीला पनवेल तालुका पोलिसांनी केले गजाआड

कासाडी नदीत केमिकल्सने विषप्रयोग?; मासे आणि गुरे मृत झाल्याने शिवसेना आक्रमक

4k समाचार 
पनवेल दि.१२(वार्ताहर): पडघे गावाजवळून तळोजा औद्योगिक वसाहतीमधून वाहणा-या कासाडी नदीत केमिकल टाकून विष प्रयोग करणा-यांवर कारवाई करा अशी तक्रार शिवसेनेचे उप तालुकाप्रमुख कैलास माळी आणि शिवसैनिक राहुल कांबळे यांनी केली आहे. त्या कासाडी नदीतील केमिकमुळे त्या भागातील काही गुरे आणि मासे मृत झाले असून दुर्गंधीने नागरिक त्रस्त आहेत


पनवेल तालुक्यातील तळोजा औद्योगिक वसाहतीमधून कासाडी नदी वाहते.पूर्वी पांढरी शुभ्र दिसणारी नदी आता प्रदूषणाने काळवंडली आहे.आजूबाजूचे कारखाने आपला घनकचरा,सांडपाणी आणि रसायने या नदीत बिनधास्त टाकतात.पडघे गावातून ही नदी वाहते.या नदीला लागून काही कारखान्यांनी कच्चे कंपाऊंड टाकले आहे.

या ठिकाणी रसायन मिश्रीत वस्तू गोण्यांमध्ये भरून ठेवले आहेत.त्यामुळे तेथे एकप्रकारे गोदाम तयार झाले आहे.याच ठिकाणाहून  हे रसायन शेजारीच असलेल्या कासाडी नदीत लपूनछपून टाकले जाते.हा प्रकार रोजचा असल्याने त्या ठिकाणी नदीत मोठ्या प्रमाणात प्रदूषण झाले आहे. हे केमिकल संपूर्ण नदीत पसरल्याने या भागात नदीचे पाणी पूर्ण प्रदूषित झाले आहे. 

त्यामुळे मासे आणि इतर जनावरे,गुरे मृत्यूमुखी पडले आहेत.याबाबत शिवसेनेचे उप तालुकाप्रमुख कैलास माळी आणि शिवसैनिक राहुल कांबळे यांनी याठिकाणी छापा टाकला.पण रसायन टाकणारे हे तेथून पळून गेले.त्यामुळे अशा प्रदूषण करणा-या कारखाने आणि व्यक्तींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रत्यक्ष पाहणी करावी असे देखील त्यांचे म्हणणे आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top