नवीन बातम्या
पनवेल जिल्हा काँग्रेसतर्फे भारत रक्षक BLA-2 SIR प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न
*कळंबोलीत पोलिओ लसीकरण दिन साजरा; नगरसेविका सौ. बायजा बारगजे यांच्या हस्ते उद्घाटन*
आमदार विक्रांत पाटील जनसेवा कार्यालयात ‘मन की बात’ कार्यक्रमाचे सामूहिक श्रवण
सहाय्यक पोलीस आयुक्तपदी नितीन ठाकरे यांची पदोन्नती; बाळासाहेब पाटील व आमदार विक्रांत पाटील यांच्याकडून सत्कार
आंतरराष्ट्रीयअंमली पदार्थ नशा-मुक्ती दिनानिमित्त पनवेलमध्ये जनजागृती कार्यक्रमपनवेल,
फक्त रोख रक्कम चोरणारा सराईत गुन्हेगार पनवेल शहर पोलिसांच्या ताब्यात
शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटपाचा उपक्रम 1 जुलै रोजी
पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या वपोनि पदी बाळा कुंभार तर उरण पोलीस ठाण्याच्या वपोनि पदी पृथ्वीराज घोरपडे
पनवेल शहर वाहतूक शाखेच्या सतर्कतेमुळे केरळमधून चोरीस गेलेली दुचाकी हस्तगत

जागतिक प्रीमॅच्युरिटी दिनानिमित्त खारघरच्या मदरहुड हॉस्पिटलमध्ये विविध उपक्रम

अकाली जन्मलेल्या बाळांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार – वेशभुषा स्पर्धा, जादुचे प्रयोग, कार्टून पात्रांच्या उपस्थितीत मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन
नवी मुंबई* – खारघरच्या मदरहूड हॉस्पिटल्स येथे जागतिक प्रीमॅच्युरिटी डे निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात पालक आणि वैद्यकिय तज्ज्ञ हे मुदतपूर्व प्रसुती आणि अकाली जन्मलेल्या बालकांच्या काळजीविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी एकत्र आले होते. यानिमित्ताने याठिकाणी वेशभुषा स्पर्धा, जादुचे प्रयोग, कार्टुन पात्र, संगीत आणि अकाली जन्मलेल्या बाळांचा सत्कार असे विविध उपक्रम राबविण्यात आले.



जागतिक प्रीमॅच्युरिटी डे कार्यक्रमात मुलांसाठी विविध मनोरंजनात्मक उपक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली. या ठिकाणी केक कापून, बक्षिस वितरण समारंभाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

भारतात सुमारे 13% बाळं ही अकाली जन्माला येतात, म्हणजेच 37 पूर्ण आठवडे पूर्ण होण्याआधीच या बाळांचा जन्म होत असल्याची प्रतिक्रिया डॉ. अनिश पिल्लई,(मदरहूड हॉस्पिटल्स, खारघर, नवी मुंबई येथील नवजात शिशु व बालरोगतज्ज्ञ) यांनी व्यक्त केली. गर्भधारणेच्या 28 आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत जन्माला आलेल्या एक्स्ट्रीमली प्रीटर्म म्हणून ओळखले जाते. या असुरक्षित अर्भकांची काळजी घेणे आव्हानात्मक असून अनेकदा नवजात अतिदक्षता विभाग (NICU) मध्ये यांना उपचारांची आवश्यकता भासते. वैद्यकीय तंत्रज्ञानातील प्रगती मुळे जसे की इनक्यूबेटर केअर,व्हेंटिलेशन तंत्र,  पोषण आणि अल्ट्रा साऊंड तपासणीद्वारे आकाली जन्मलेल्या बाळांचे जगण्याचे प्रमाण सुधारले आहे.


मदरहूड हॉस्पिटल्समध्ये काळजी घेतलेल्या मुलांच्या पालकांनी व्यक्त केलेला विश्वास आणि कृतज्ञता ही आमच्या आरोग्य सेवा टीमला मिळालेली पोचपावती आहे अशी प्रतिक्रिया डॉ. रुपाली कदम(मदरहूड हॉस्पिटल्स, खारघर, नवी मुंबई येथील फॅसिलिटी डायरेक्टर) सांगतात की, आम्हाला या अकाली जन्माला आलेल्या बाळांना अनेक गंभीर आरोग्य समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. हा मनोरंजनात्मक कार्यक्रम करण्यामागचा हेतू म्हणजे अकाली जन्मलेल्या बाळांचा आणि त्यांच्या कुटुंबांचे कौतुक करणे. आमचा असा विश्वास आहे की वैद्यकीय तज्ज्ञ आणि कुटुंब यांच्यातील बंध मजबूत करण्यास मदत करते.



हा कार्यक्रम पालकांना आणि समाजाला मुदतपूर्व जन्म आणि विशेषतः नवजात बालकांच्या काळजीची अत्यावश्यक भूमिका याबद्दल शिक्षित करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरत आहे. संपूर्ण प्रवासात प्रीटर्म अर्भकांना उच्च दर्जाची काळजी प्रदान करण्याच्या आणि त्यांच्या कुटुंबांना आधार देण्यासाठी आमची संपुर्ण टिम सज्ज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top