नवीन बातम्या
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन

विख्यात शास्त्रीय व भजन गायक ह. भ. प. निवृत्तीबुवा चौधरी यांचा सहस्रचंद्र सोहळा

पनवेल (प्रतिनिधी) बालयोगी श्री. सदानंद महाराज आश्रम संस्थेच्यावतीने रायगड जिल्ह्यातील पनवेल येथील नादब्रम्ह साधना मंडळाचे संस्थापक तथा विख्यात शास्त्रीय व भजन गायक ह. भ. प. निवृत्तीबुवा चौधरी यांचा सहस्रचंद्र सोहळा गुरुवार दिनांक ५ डिसेंबर रोजी दुपारी ३. ३० वाजता ठाणे जिल्ह्यातील श्रीक्षेत्र गणेशपुरी येथे आयोजित करण्यात आला आहे.


 नवी, मुंबई, रायगड, ठाणे, मुंबई तसेच राज्यातील परिसरात ह. भ. प. निवृत्तीबुवा चौधरी यांनी शास्त्रीय संगीत व भजन संगीतच्या प्रचार व प्रसारासाठी अपार मेहनत घेतली आहे. ६० वर्षेहून अधिक काळ त्यांनी या क्षेत्राची सेवा केली आहे. त्यांनी या क्षेत्रातून अनेक हजारो शिष्य घडविले आहेत.

त्यांच्या या शिकवणीतून तयार झालेल्या कलाकारांनी आपले नाव उंचावले आहे. ह. भ. प. निवृत्तीबुवा चौधरी यांचे संगीत क्षेत्रातील कार्य समाजाला नेहमी मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरले आहे.

त्या अनुषंगाने त्यांचा ह. भ. प. निवृत्तीबुवा चौधरी यांचा सहस्रचंद्र सोहळा बालयोगी श्री. सदानंद महाराज आश्रम संस्थेच्यावतीने होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top