नवीन बातम्या
How to Create an Online Course Marketplace in WordPress (Multiple Instructors)
WordPress.org blog: WordPress Signs the Open Weights and American AI Leadership Letter
कॉमनवेल्थ टेबल टेनिस स्पर्धेत स्वस्तिका घोषची सुवर्ण झेप लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार; ५० हजार रुपयांचे बक्षीस
पत्रकारांनी घेतली पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांची भेट बहुउद्देशीय पत्रकार भवनासाठी भूखंडाची मागणी
कळंबोलीतील वाहतूक कोंडीबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे वाहतूक शाखेला निवेदन
Open Channels FM: X vs Nitter and XCancel, AI Middleware, and Accelerated Online College Degrees
आकाशाची राणी’ नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर; पहिल्या बोईंग ७४७ मालवाहू विमानाचे आगमन
‘क्वीन ऑफ द स्काइज’चे नवी मुंबईत पदार्पण; मुंबईच्या हवाई मालवाहतुकीला नवी दिशा
३० ऑगस्टला पनवेलमध्ये माजी न्यायमूर्ती अभय ओक यांचे विशेष व्याख्यान
गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी शिवसेना पनवेलतर्फे मोफत बस सेवा

कॉमनवेल्थ टेबल टेनिस स्पर्धेत स्वस्तिका घोषची सुवर्ण झेप लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार; ५० हजार रुपयांचे बक्षीस

4kNews कामोठे
पनवेल, दि. २७ (प्रतिनिधी) : कॉमनवेल्थ टेबल टेनिस चॅम्पियनशिप २०२६ मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत पनवेलच्या स्वस्तिका संदीप घोष हिने सुवर्णपदक पटकावले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन तथा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी स्वस्तिकाचा सत्कार करून तिला ५० हजार रुपयांचे बक्षीस दिले.



स्वस्तिका ही न्यू पनवेल येथील चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमध्ये इंग्रजी विभागात पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. शिक्षणासोबत टेबल टेनिसमध्ये सातत्यपूर्ण सराव आणि मेहनतीच्या जोरावर तिने राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण केली आहे.



कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतीय संघाच्या विजयात स्वस्तिकाने महत्त्वपूर्ण योगदान दिले. तिच्या सुवर्ण कामगिरीमुळे पनवेलसह महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, युवा खेळाडूंना प्रेरणा मिळाली आहे. 



यावेळी सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के. पाटील, जी. के. सुर्वे, क्रीडा प्रशिक्षक विनोद नाईक तसेच स्वस्तिकाचे वडील व प्रशिक्षक संदीप घोष उपस्थित होते.
स्वस्तिकाचे यश पनवेलच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानाचा क्षण आहे. तिच्या मेहनतीतून युवा खेळाडूंनी प्रेरणा घ्यावी,” असे रामशेठ ठाकूर यांनी सांगितले. स्वस्तिकाने मिळविलेले सुवर्णपदक जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेला समर्पित करत असल्याची भावना प्रशिक्षक संदीप घोष यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top