नवीन बातम्या
आदित्य यशवंत घरत यांची उरण तालुका काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड
एस. एस. पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये फायर अवेअरनेस प्रोग्राम आगीच्या दुर्घटनेपासून बचावासाठी विद्यार्थ्यांना अग्निशमन विभागाचे प्रशिक्षण
उरणच्या प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा २५६ कुटुंबांची यादी अंतिम करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश; ४० वर्षांच्या संघर्षाला निर्णायक दिशा
शैक्षणिक नवोपक्रमांची राज्यस्तरावर दखल
शर्मिला महेंद्र गावंड यांना ‘शिवभूमी आदर्श शिक्षक पुरस्कार’
गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी माणुसकीचा पुढाकार!
वैभव कडू यांचा स्वखर्चातून समुद्रकिनारी विसर्जन मार्ग मोकळा
How to Accept Deposits and Partial Payments in WordPress (No WooCommerce)
Open Channels FM: Introducing Open Source Champions
शेकाप व एकता असोसिएशनतर्फे आयुष्मान भारत, आभा कार्ड नोंदणी शिबिर २५० नागरिकांनी घेतला लाभ
महिला संघटन मजबूत करण्यावर निधी शिंदे यांचे मार्गदर्शन

*ऊर्जा राज्यमंत्री मा. मेघनाताई साकोरे-बोर्डीकर* यांच्या अध्यक्षतेखाली पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील वारंवार खंडित होणाऱ्या *वीजपुरवठ्याबाबत महत्त्वपूर्ण बैठक* पार पडली.

4kNews कामोठे दि. 12
पनवेल   *ऊर्जा राज्यमंत्री मा. मेघनाताई साकोरे-बोर्डीकर* यांच्या अध्यक्षतेखाली पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील वारंवार खंडित होणाऱ्या *वीजपुरवठ्याबाबत महत्त्वपूर्ण बैठक* पार पडली. या बैठकीस *मा. आमदार प्रशांतदादा ठाकूर, मा. आमदारजी महेश बालदी,* मा. महापौर नितीनजी पाटील, मा. उपमहापौर प्रमिला पाटील, स्थायी समिती सभापती बबन मुकादम तसेच माझ्यासमवेत नगरसेवक डॉ. अरुण भगत तसेच इतर मंडळ अध्यक्ष व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. 


.
बैठकीत पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील *नागरिकांना भेडसावणाऱ्या वीज समस्यांवर* सविस्तर चर्चा करण्यात आली. वारंवार होणाऱ्या वीजपुरवठा खंडितीवर तातडीने उपाययोजना करण्यात येतील, असे *आश्वासन मा. ऊर्जा राज्यमंत्र्यांनी दिले.*
.कामोठे परिसरात वाढत्या वीजमागणीमुळे वारंवार ओव्हरलोडची समस्या निर्माण होत असल्याने *नवीन ५ MVA क्षमतेच्या ट्रान्सफॉर्मरचे काम सुरू करण्यात आले* आहे, पुढील *१ ते २ दिवसात* काम पूर्ण होईल असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. 


.
तसेच *सेक्टर २५ मधील प्लॉट क्रमांक २५* येथे नव्याने उभारण्यात येणाऱ्या सब-स्टेशनबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच कामोठे परिसरात *२० ते २५ वर्ष जुन्या ३०० स्क्वेअर एम.एम (११ के.व्ही) ह्या केबल ओव्हरलोडमुळे तुटलेल्या व नुकसानग्रस्त झालेल्या* केबल्स तातडीने बदलून नवीन केबल्स टाकण्यात याव्यात व त्या केबल भूमिगत करण्यात याव्यात जेणेकरून नागरिकांना कोणतीही समस्या येणार नाही, अशी मागणी बैठकीत करण्यात आली.
.पुढील *२ दिवसांत* सुरू असलेली कामे पूर्ण झाल्यानंतर कामोठे परिसरातील वारंवार होणाऱ्या वीजपुरवठा खंडितीच्या समस्येत मोठ्या प्रमाणात सुधारणा होऊन नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top