नवीन बातम्या
महेंद्रशेठ घरत सच्चा मनाचा माणूस : हर्षवर्धन सपकाळ
काँग्रेस तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे यांचा सपत्नीक सत्कार
उरणमध्ये ‘खान्देश महोत्सव २०२६’ उत्साहात संपन्न
विंधणे कोळीवाड्यात ‘एकविरा आई प्रसन्न’ मच्छीमार सहकारी संस्थेची स्थापना
सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पनवेल शहरात पोलिसांचा रूट मार्च
अटल सेतूवरून विघ्नहर्ताची दिमाखदार स्वारी
भव्य महाआगमनाने कामोठे झाले ‘विघ्नहर्तामय’
माँसाहेब ठाकरे स्मृतिदिनानिमित्त तळोज्यात आयुष्मान-आभा कार्ड शिबिर
कळंबोलीकर तहानले; सिडकोविरोधात शिवसेना आक्रमक
राष्ट्रीय संशोधन स्पर्धेत सी.के.टी. महाविद्यालयाला द्वितीय क्रमांक
इनर व्हील क्लब ऑफ पनवेल. डिस्ट्रिक्ट ३१३; सीमेवरील जवानांसोबत रक्षाबंधन

उरणमध्ये ‘खान्देश महोत्सव २०२६’ उत्साहात संपन्न


4kNews कामोठे
उरण, दि.  9(विठ्ठल ममताबादे) : ‘नाते मातीशी’ ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवून खान्देश विकास मंडळ, उरण यांच्या वतीने आयोजित ‘खान्देश महोत्सव २०२६’ उत्साहात पार पडला. करंजा रोड येथील भारती बँक्वेट हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला खान्देशी समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 



महोत्सवात सत्यनारायण महापूजा, स्नेहमेळावा, सामूहिक भोजन तसेच विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सन्मान करण्यात आला. खान्देशातून सेवामुक्त झालेले कर्मचारी, खान्देशी डॉक्टर आणि ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करून त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.



यावेळी उरणचे आमदार महेश बालदी, जेएनपीटीच्या जनरल मॅनेजर मनीषा जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश शेलकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र ट्रिपल केसरी तथा सहाय्यक पोलीस आयुक्त विजय चौधरी आणि उरण नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष रवीशेठ भोईर यांचीही विशेष उपस्थिती होती.



खान्देशी हास्यकलाकार व अभिनेते विलासकुमार शिरसाठ यांच्या मनोरंजन कार्यक्रमाने उपस्थितांची दाद मिळवली. मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चित्ते, कार्याध्यक्ष सुनील चौधरी, सचिव सचिन खैरनार यांच्यासह पदाधिकारी व सदस्यांनी महोत्सवाच्या आयोजनासाठी परिश्रम घेतले. सामूहिक भोजनासह विविध उपक्रमांतून खान्देशी संस्कृती, परंपरा आणि सामाजिक एकोपा जपण्याचा संदेश देण्यात आला. एकूणच महोत्सव हा स्नेह, संस्कृती आणि सामाजिक एकोप्याचा सुंदर संगम ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top