नवीन बातम्या
ड्राइव्ह सेफ ३६०’ अभियानातून रस्ते सुरक्षेचा संदेश
रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ‘मराठी माझी देवालाही आवडे’ कार्यक्रम संपन्न
रामशेठ ठाकूर यांच्या उपस्थितीत संतगीतांचा सुरेल सोहळा; महापौर नितीन पाटील यांचा सन्मान
तरुणी बेपत्ता; पनवेल तालुका पोलिसांकडून शोध सुरू
विजय साबळे बेपत्ता; कामोठे पोलिसांत नोंद
शिवसेनेच्या मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
१.२२ कोटींचा मुद्देमाल मूळ मालकांना परत
सात पोलीस ठाण्यांतील ४८ गुन्ह्यांची उकल; १४० मोबाईल, दागिने, आठ वाहने आणि रोकड हस्तांतरित
क्रांती सम्राट’च्या संपादिका दिपालीताई पारसकर यांना ‘न्यायसखी पुरस्कार’ महापौर नितीन पाटील यांच्या हस्ते कळंबोलीत सन्मान
पनवेलमध्ये ३० हजारांच्या पितळी समयांची चोरी; एकाला अटक
‘गावाच्या विकासासाठी ग्रंथालय उभारणे आवश्यक’
डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते के. गो. लिमये सार्वजनिक वाचनालयाच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन

खोपटा पुलाची पाहणी; वाहतूक कोंडीतून लवकरच सुटका होण्याची अपेक्षा १० ऑक्टोबरपर्यंत वाहतूक सुरू करण्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे आश्वासन

4kNews कामोठे
उरण, दि. 23 (विठ्ठल ममताबादे) : उरण तालुक्यातील खोपटा पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने या मार्गावर वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. याचा विद्यार्थी, नोकरदार, वाहनचालक आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या पदाधिकाऱ्यांनी पुलाच्या दुरुस्तीच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली.



यावेळी शिवसेनेचे माजी आमदार मनोहर शेठ भोईर, तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, मनसेचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. सत्यवान भगत, उरण पंचायत समिती सदस्या कविता पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप चव्हाण, उपअभियंता एम. डी. पाटील यांच्यासह दोन्ही पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.



पाहणीदरम्यान दुरुस्तीच्या कामाचा दर्जा, काम पूर्ण होण्याचा कालावधी आणि वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका कधी होणार, याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. १० ऑक्टोबरपर्यंत पुलावरील वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात येईल, तसेच पुलाच्या दोन्ही बाजूंच्या जोडरस्त्यांचे डांबरीकरण केले जाईल, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले.



दिलेल्या आश्वासनाची वेळेत पूर्तता करून दुरुस्तीचे काम दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. जनहिताच्या प्रश्नांवर दोन्ही पक्ष एकत्रितपणे आवाज उठवत राहतील, असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top