पनवेल दि. २३ 4k समाचार संजय कदम ( वार्ताहर ) : रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलचा नुकताच पदग्रहण सोहळा उत्साहात पार पडला. रोटरी प्रांत थ्री वन थ्री वन चे नियोजित प्रांतपाल चारु श्रोत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. या वेळी अनिल ठकेकर यांची क्लबच्या अध्यक्षपदी, तर अतिश थोरात यांची सचिवपदी निवड करण्यात आली.

त्याचबरोबर इतर पदाधिकाऱ्यांनीही आपापल्या पदाची सूत्रे स्वीकारली. या पदग्रहण सोहळ्याला माजी प्रांतपाल डॉक्टर गिरीश गुणे, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, रोटरी प्रांत थ्री वन थ्री वन चे फाउंडेशन डायरेक्टर राजेश राऊत, सहाय्यक प्रांतपाल डॉक्टर स्वाती लिखिते यांच्यासह रोटरीचे सदस्य उपस्थित होते.
