पनवेल दि.१४ 4News) : रायगड जिल्हा क्षयरोग विभागा मार्फत आणि जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली १०० दिवसीय टीबी मुक्त अभियान संपुर्ण रायगड जिल्ह्यात राबवण्यात येत आहे. या अभियानात सामाजिक दायित्वच्या भावनेतून माजी नगरसेवक विकास घरत यांनी क्षयरोग निदान झालेल्या कामोठेमधील ५ व्यक्तींना पोषणासाठी सहाय्य दिले.

या अभियानात अतिजोखमीच्या व्यक्तींची नॅट आणि एक्स रेच्या मदतीने क्षयरोगासाठी तपासणी करण्यात येत आहे. तसेच क्षयरोग निदान झालेल्या व्यक्तींवर त्वरित तसेच योग्य उपचार करण्यात येत असून क्षयरोग निदान झालेल्या व्यक्तींना पोषणासाठी निक्षय पोषण योजनेचा लाभ तसेच निक्षय मित्र बनवून पोषणासाठी सहाय्य देण्यात येत आहे.

त्यापार्श्वभुमीवर या अभियानात सामाजिक दायित्वच्या भावनेतून माजी नगरसेवक विकास घरत यांनी क्षयरोग निदान झालेल्या कामोठेमधील ५ व्यक्तींना पोषणासाठी सहाय्य दिले. याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.\
