पनवेल, दि.14 (4kNews) ः आज श्री दत्त जयंती सोहळा पनवेल तालुक्यात मोठ्या धार्मिकतेने तसेच विविध कार्यक्रमाद्वारे संपन्न होत आहे. या सोहळ्याला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख शिरिष घरत यांनी भेटी देवून आशिर्वाद घेतले आहे.

खारघर, बेलपाडा, रोडपाली, कळंबोली आदींसह ग्रामीण भागातील विविध श्री दत्त जयंती सोहळ्याला जिल्हाप्रमुख शिरिष घरत यांनी भेटी दिल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने खिडूकपाडा येथील प्रभुदास अण्णा भोईर यांची श्री दत्त जयंती, शिवसेना विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर यांची रोडपाली येथील श्री दत्त जयंती, खुटुकबांधन येथील दत्त जयंती आदी ठिकाणी भेटी दिल्या आहेत.

यावेळी त्यांच्या समवेत शिवसेना महानगर समन्वयक दिपक घरत, नामदेव घरत उपस्थित होते. त्याचप्रमाणे शिवसेना विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर यांची रोडपाली येथील श्री दत्त जयंतीला शिवसेना उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील यांनी सुद्धा भेट दिली आहे.

यावेळी त्यांचे स्वागत प्रदीप ठाकूर व त्यांचे बंधू संदेश केसरीनाथ ठाकूर यांनी केले. यानिमित्त प्रदीप ठाकूर यांनी आज सकाळी श्री दत्ताचा अभिषेक, श्री सत्यनारायणाची महापूजा, किर्तन, अभंगवाणी व सायंकाळी तिर्थप्रसाद व महाप्रसादाचे आयोजन केले होते. सदर कार्यक्रम श्री दत्त मंदिर चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून संपन्न झाला. या कार्यक्रमाचा लाभ शेकडो भाविकांनी घेतला.
