बोलण्यात गुंतवून दुकानातील रोख रक्कम केली लंपास


पनवेल, दि.12 (वार्ताहर) ः बोलण्यात गुंतवून दोघा अनोळखी व्यक्तींनी दुकान मालकाला बोलण्यात गुंतवून दुकानातील कॅश काऊंटरमधून रोख रक्कम लंपास केल्याची घटना ओरियन मॉलमध्ये घडली आहे.


येथील अमुक्ती शॉपमध्ये दोन अनोळखी व्यक्ती त्यामध्ये एक पुरुष व एक महिला ग्राहक बनून दुकानात आले व त्या पैकी अनोळखी मुलीने दुकानातील कर्मचार्‍याला बोलण्यात गुंतवून तिच्याबरोबर असलेल्या मुलाने दुकानातील कॅश काऊंटमध्ये ठेवलेली 20 हजार रु. रोख रक्कम लबाडीने चोरुन ते पसार झाले आहेत. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top