पनवेल, दि.12 (वार्ताहर) ः एका अज्ञात चोरट्याने पनवेल तालुक्यातील नेरे सुपर मार्केट शॉपमध्ये चोरी करून आतील ऐवज तसेच रोख रक्कम चोरुन नेल्याची घटना घडली आहे.

नेरे सुपर मार्केट शॉपचे शटर अज्ञात चोरट्याने कश्याचे तरी सहाय्याने तोडून व आत प्रवेश करून दुकानातील विविध सामान व रोख रक्कम असा मिळून जवळपास 71 हजार 500 रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला आहे. याबाबतची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
