पनवेल, दि.12 (वार्ताहर) ः शिवशक्ती मित्र मंडळ, लाईन आळी पनवेलने आयोजित केलेल्या लाईन आळी क्रिकेट प्रिमियर लीग 2025 अलंकार फाईटर्स प्रथम तर अभिज स्ट्रायकर्स द्वितीय क्रमांक पटकाविला आहे.

शिवशक्ती मित्र मंडळ, लाईन आळी पनवेल लाईन आळी प्रीमियर लिग – 2025 यंदाचे 10 वे वर्ष होते. संघ मालक अलंकार महाजन ह्यांचा अलंकार फाईटर्स प्रथम व उप विजेता संघ ठरला आहे संघ मालक संदीप पाटील ह्यांचा अभी’ज स्ट्रायकर्स हा ठरला आहे. या स्पर्धेसाठी विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार उपस्थित होते.

त्यामध्ये प्रामुख्याने चंद्रशेखर सोमण, महेश सावंत, संजय कदम, हेमंत सावंत, दिलीप चंदने, चंदू म्हात्रे, केदार भगत, सुमित झुंजारराव, अभिजित साखरे, आकाश घाटे, शांतनु घरत, शुभम माळी असे अनेक मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी उपस्थित होते. आमदार विक्रांत पाटील यांच्या हस्ते या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा पार पडला.

त्यावेळी उपस्थित मंडळाचे संस्थापक अध्यक्ष रमेश दादा गुडेकर, मंडळाचे अध्यक्ष संदीप पाटील, उपाध्यक्ष रवी (पिंट्या) गोरे, कार्याध्यक्ष खंडेश धनावडे, कार्याध्यक्ष समीर कदम, सहकार्याध्यक्ष प्रकाश (नानू) वाघे, सहकार्याध्यक्ष प्रविण पोवार, संयुक्त चिटणीस प्रशांत नरसाळे, हिशोब तपासणीस अरुण ठाकूर, खजिनदार संतोष तळेकर, सहखजिनदार अनिकेत जाधव व त्याच बरोबर मंडळाचे सभासद उपस्थित होते. लाईन आळी प्रीमियर लिग ह्या स्पर्धेसाठी लाईन आळी प्रीमियर लिग कमिटीने दिवस रात्र मेहेनत करून ही स्पर्धा यशस्वी रित्या पार पडली.
