स्कुटी गाडीची चोरी


पनवेल, दि.12 (वार्ताहर) ः पनवेल शहरातील शिवशंभो नाका येथील न्यू पंजाब हॉटेल समोर उभी करून ठेवलेली दुचाकी गाडी अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची घटना घडली आहे. 


दिनेश राजानी यांनी त्यांची 20 हजार रुपये किंमतीची होंडा अ‍ॅक्टीव्हा गाडी ही हॉटेल समोर उभी असताना अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top