नवीन बातम्या
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त नविन पनवेल भाजप मंडलाचे रक्तदान शिबिर उत्साहात
Open Channels FM: Our Guide to Open Channels FM Podcast Network’s Channels, Series, and Blog
पनवेल कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पदी देवेंद्र गंगाराम मढवी यांची  बिनविरोध निवड.
हिंदू देवी-देवतांचा अवमान केल्याचा कांबळे कुटुंबावरील आरोप खोटा; तळोजा वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण भगत यांचे स्पष्टीकरण
शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा; कर्जमाफीमुळे बळीराजाला मोठा दिलासा – नामदार ॲड. आशिष शेलार
रायगड जिल्हा किसान मोर्चातर्फे पनवेलमध्ये ‘कृतज्ञता मेळावा’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानले आभार
सन्माननीय रिपाइं नेते नरेंद्र गायकवाड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जुलै २०२६ संपूर्ण महिनाभर विविध कार्यक्रम हाती घेण्यात आले
लोकप्रतिनिधींच्या पत्रांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
नगरसेवक प्रथमेश सोमण प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर बरसले!
फिजिबिलिटी अहवालासाठी 50 हजारांची लाच; महावितरणचा सहायक अभियंता एसीबीच्या जाळ्यात
पनवेल महानगरपालिकेच्या निष्काळजी आणि बेजबाबदार कारभाराचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने केला संताप व्यक्त

रायगड हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय निष्काळजीमुळे १६ वर्षीय रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू; २०२४ चे प्रकरण- चार डॉक्टर व हॉस्पिटल व्यवस्थापन आरोपी 

4kNews दि. 10
पनवेल (प्रतिनिधी) नेरळ पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या वैद्यकीय निष्काळजीपणाच्या प्रकरणी कर्जत तालुक्यातील डिकसळ येथील रायगड हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्चच्या चार डॉक्टरांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर पुढील तपासाच्या आधारे हॉस्पिटल व्यवस्थापनाचे डॉ. नंदकुमार बादवराव तासगावकर, यादवराव हिरप्पा कांबळे, वंदना नंदकुमार तासगावकर, डॉ. शशिकांत रामचंद्र गंगावणे व चंद्रशेखर सिताराम सुळगावकर यांच्यावर जबाबदारी निश्चित करून या गुन्ह्यात त्यांनाही आरोपी करण्यात आले आहे.  



नेरळ मधील नाणिवली गावातील १६ वर्षीय रोहित गवळी याच्यावर रायगड हॉस्पिटलमध्ये करण्यात आलेल्या अपेन्डिस शस्त्रक्रिया दरम्यान भूलतज्ज्ञकडून भूल न देता डॉक्टरांमार्फत चुकीची भूल देण्यात आली. आणि शस्त्रक्रियेदरम्यान रोहितचा दुर्देवी मृत्यू झाला. मात्र त्याची कल्पना त्याच्या कुटुंबाना न देता ती माहिती रुग्णालयाकडून लपवून ठेवण्यात आली होती. अत्यंत वेदनादायक अशा प्रकाराने संपूर्ण रायगड जिल्हा हळहळला होता.  मुलगा दगावल्याने वैद्यकीय हलगर्जी प्रकरणात डॉ. अमरसिंह बाबासाहेब कांबळे, डॉ. महंमद दानीश मुस्ताक अहमद, डॉ. तेजेश दत्तात्रेय हुजरे व डॉ. शिवकुमार वेलुदास यादव यांच्याविरोधात कठोर कारवाई करावी, तसेच मेडिकल कौन्सिल व इतर संबंधित प्राधिकरणांकडे तक्रार दाखल करून आवश्यक ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारा अर्ज पालकांकडून सादर झाला होता. सदर अर्ज नेरळ पोलीस ठाणे येथे वरिष्ठ अर्ज क्रमांक १२०/२०२६ अन्वये नोंदविण्यात आलेला आहे. 

या संदर्भात, नेरळ पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक ४८/२०२४ भारतीय दंड संहिता कलम ३०४(अ) व ३४ अन्वये दिनांक ०२ मार्च २०२४ रोजी रात्री २३:२९ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे यांनी सखोलपणे करून संबंधित आरोपींविरुद्ध आवश्यक ते पुरावे संकलित केले. तसेच मेडिकल कौन्सिलने संबंधित चार डॉक्टर आणि व्यवस्थापनाला दोषी ठरवले. तपासाअंती उपलब्ध झालेल्या पुराव्यांच्या आधारे वरील नमूद डॉक्टर आरोपींविरुद्ध दिनांक ०४ सप्टेंबर २०२५ रोजी मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, कर्जत यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल करण्यात आले असून त्याची नोंद समरी केस क्रमांक ३८९/२०२५ अशी करण्यात आलेली आहे. तसेच, तपासादरम्यान संबंधित घटनेत हॉस्पिटल व्यवस्थापनाची देखील जबाबदारी आढळून आल्याने चेअरमन डॉ. नंदकुमार तासगावकर, सेक्रेटरी यादवराव कांबळे, जॉईंट सेक्रेटरी वंदना नंदकुमार तासगावकर, विश्वस्त डॉ. शशिकांत रामचंद्र गंगावणे व चंद्रशेखर सिताराम सुळगावकर यांना देखील या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे. त्यांच्या विरोधात दिनांक ०३ एप्रिल २०२६ रोजी पूरक दोषारोपपत्र मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, कर्जत यांच्या न्यायालयात सादर करण्यात आलेले आहे. 



सर्वसामान्य रुग्णांना योग्य ते उपचार न देता रुग्णांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या आणि निष्काळजीपणाने वागणाऱ्या या रुग्णालयाच्या व्यवस्थापनालाही सहआरोपी करण्यात आले. यामुळे निष्काळजीपणा व बेजबाबदारपणा करणाऱ्यांना धडा मिळाला आहे. सदरचे प्रकरण माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी काळजीपूर्वक पाठपुरावा करून मार्गस्थ लावला. यापुढे जिल्ह्यात अशा प्रकारची निष्काळजी बेजबाबदारीची प्रकरण झाली तर संबंधितांनी भाजप कार्यकर्त्यांकडे संपर्क साधावा, असे आवाहन भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले असून न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top