नवीन बातम्या
पनवेलमध्ये साडेनऊ लाखांची वीज चोरी उघड; एकावर गुन्हा दाखल
सेनेची बांधणी अधिक मजबूत करण्याासाठी पनवेलमध्ये बैठक संपन्न

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 135 वा जयंती महोत्सव पनवेल शहरामध्ये संपन्न
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने पनवेल महानगरपालिकेची शिवसेना शाखा तोड कारवाई परतावली
शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्ष बालसंस्कार वर्ग संपन्न
पनवेल शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा धामापूरकर यांना बढती
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्था (केजीपी) संचलित शाळांचा १२ वी चा निकाल १०० %
बंबई पाडा परिसरात आढळला एका महिलेचा संशयास्पद मृतदेह 
सुकापूर येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे भव्य हळदीकुंकू कार्यक्रम व व्याख्यान संपन्न

*लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदानाचा संकल्प*


*केदार भगत मित्र परिवाराचा उपक्रम*
*पनवेल/प्रतिनिधी:* लोकनेते मा.खा.रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त केदार भगत मित्र परिवाराकडून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.रविवार दिनांक 1 जून रोजी लोकनेते दि.बा.पाटील विद्यालयात सकाळी 9 ते 2 वाजेपर्यंत हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

या शिबिराला स्वतः लोकनेते मा.खा.रामशेठ ठाकूर यांच्यासह आ.प्रशांत ठाकूर,आ. महेश बालदी, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, माजी नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे, माजी सभागृह नेते परेश ठाकूर,माजी विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे ,उद्योजक राजू गुप्ते,मंगेश परुळेकर हे उपस्थित राहणार आहेत

व अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच यावेळी दि न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीचा 1 लाखापर्यंत चा अपघाती विमा मोफत काढून दिला जाणार असल्याचे आयोजक भाजप पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top