नवीन बातम्या
वैभव कडू यांच्या पुढाकाराने नागाव गोसपाडा समाजमंदिराची दुरुस्ती श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले आभार
माणुसकी हाच खरा धर्म : महेंद्रशेठ घरत
नागाव पिरवाडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम उत्साहात
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत

गुरुनानक जयंती

शीख धर्माचे पहिले गुरु आणि संस्थापक गुरुनानक देवजी यांची जयंती पनवेल परिसरात भक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात बुधवारी साजरी झाली. या पवित्र पर्वाच्या निमित्ताने माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे यांनी पनवेल, कळंबोली आणि खारघर मधील गुरुद्वारांमध्ये जाऊन दर्शन घेतले आणि गुरुनानक देवजींना नमन केले. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पनवेल येथील गुरुद्वारांमध्ये भेट देऊन प्रार्थना केली आणि शीख बांधवांना शुभेच्छा दिल्या. 

तसेच आमदार प्रशांत ठाकूर यांनी या पवित्र दिवशी गुरुनानक देवजींच्या मानवतेचा संदेश आणि समानतेच्या शिकवणीचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी कळंबोली मंडल अध्यक्ष अमर पाटील, खारघर मंडल अध्यक्ष प्रविण पाटील, माजी नगरसेवक संतोष शेट्टी, बबन मुकादम, नरेश ठाकूर, निलेश बावीस्कर, युवा नेते हॅप्पी सिंग, माजी नगरसेविका मोनीका महानवर, सरस्वती काथारा,  किरण पाटील, प्रभाग १६ अध्यक्ष शिवाजी भगत, निशात सिंग गिल, लाड्डी सिद्धू यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top