पनवेल, दि.30 (संजय कदम) ः रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल नवी मुंबई पोलीस आयुक्तालय परिमंडळ 2 पनवेल व आर.झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयुक्तालयातील

अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी मोफत नेत्र चिकित्सा शिबीराचे आयोजन करण्यात आले होते त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून जवळपास 110 अधिकारी व कर्मचार्यांनी या शिबिराचा लाभ घेतला.

पीडीजे डॉ.गिरीश गुणे यांच्या मार्गदर्शनाखाली हे 36 वे वर्ष असून हा उपक्रम यशस्वी होण्याकरिता रोटरीचे अध्यक्ष रो.शैलेश पोटे, मेडीकल डायरेक्टर रो.डॉ.लक्ष्मण आवटे यांच्यासह रोटरी क्लबचे पदाधिकारी व सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.

त्याचप्रमाणे पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि नितीन ठाकरे व इतर अधिकारी व कर्मचार्यांनी सुद्धा या उपक्रमाला भरघोस पाठींबा दिला. त्याप्रमाणे उपस्थित आवश्यक असणार्या तपासण्या करणार्या रुग्णांना मोफत चष्मे वाटप सुद्धा यानिमित्ताने करण्यात आले.
