समाचार पनवेल दि. ११ ( संजय कदम ) : पनवेल जवळील मुंबई एक्सप्रेस रोड वर ब्रिज च्या ५०० मिटर अलीकडे ट्र्क चालकाला झोप लागल्याने गाडी बाजुला लावून तो झोपला असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने लाखो रुपये किमतीचा माल ट्रक च्या आंतमधून चोरुन नेल्या प्रकरणी पनवेल तालुका पोलिसांनी दोघा जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरीचा माल हस्तगत केला आहे .

फिर्यादी प्रविन्द्र सींग ठाकुर, वय-३४ याने याबाबत पनवेल तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करताच वपोनि गजानन घाडगे, पोनि (गुन्हे) आनंदा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अनिरुद्ध गिजे , पो उपनिरीक्षक हर्षल राजपूत , पोहवा धुमाळ ,तांडेल ,कुदळे , बाबर , देवरे , म्हारसे ,पोशी भगत , खताळ आदींच्या पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी झायेद मुस्तफा फारुकी वय -19 वर्षे व कैस मुस्तफा राईन वय – 19 वर्षं दोन्ही राहणार – तुर्भे स्टोअर झोपडपट्टी, नवी मुंबई येथून ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल फॅब्रिक रोल्स एकुण ३ बॉक्स किंमत २२,००० रुपये ज्यावर बॉक्सवर प्लॅस्टीक कॅरीबॅगने गुंडाळले होते.

तसेच त्यावर लाल अक्षरामध्ये FE असे लिहीलेले होते. कॉफी पावडर चे ज्यावर माऊंटन ट्रॉल फूड्स प्राव्हेट लिमिटेड असे लिहीलेले एकुण २५ गोणी व १० बॉकस असे एकुण ३५ बॉक्स किंमत अंदाजे २,६०,००० रुपये. असा एकुण २,८२,००० लाख रुपये किमतीचा माल हस्तगत करण्यात आले आहे .
