नवीन बातम्या
GJS 2026 दिवाळी आवृत्तीचे उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन
SCI भारताच्या सागरी महत्त्वाकांक्षेचा आधारस्तंभ : सोनोवाल
*बनावट नंबर प्लेट चा वापर करून विनयभंग व अपघात करणारा थार चालक यास अवघ्या 10 तासात ताब्यात घेतलेबाबत*
पनवेलच्या सांगुर्ली जिल्हा परिषद शाळेची यशोगाथा राष्ट्रीय पोर्टलवर‌.मुख्याध्यापिका मानसी भोसले यांच्या लेखणीतून उलगडला शैक्षणिक परिवर्तनाचा प्रेरणादायी प्रवास
पनवेलमध्ये त्वचा, केस, लेझर व एस्थेटिक केअरसाठी अत्याधुनिक ‘Skinourish’चे उद्घाटन
पनवेलच्या गुलाब बागवानची दिल्लीपर्यंत भरारी
नित्याज जेम्स अँड ज्वेलरीचा आयपीओ ३० सप्टेंबरला खुला
सज्ज आहेत माझे हात : अपोलो हॉस्पिटल्सच्या सीपीआर मोहिमेची विश्वविक्रम नोंद 30 दिवसांत 61,221 नागरिकांनी घेतली सीपीआर शिकण्याची शपथ
CREDAI MCHI YOUTH NMR कडून नवी मुंबई व रायगडमध्ये ‘Ease of Doing Redevelopment (EODR) 2.0’ची घोषणा

सहाय्यक पोलीस आयुक्तपदी नितीन ठाकरे यांची पदोन्नती; बाळासाहेब पाटील व आमदार विक्रांत पाटील यांच्याकडून सत्कार


4kNews कामोठे
पनवेल, दि.30 (वार्ताहर) : पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांची सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) पदावर पदोन्नती झाल्याने पोलीस दलासह सामाजिक व राजकीय क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



या निमित्ताने कोंकण म्हाडाचे सभापती बाळासाहेब पाटील तसेच आमदार विक्रांत पाटील यांनी नितीन ठाकरे यांची भेट घेऊन पुष्पगुच्छ प्रदान करत त्यांचा सत्कार केला. यावेळी त्यांनी ठाकरे यांना पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा देत त्यांच्या उल्लेखनीय कार्याचे कौतुक केले. पनवेल शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असताना नितीन ठाकरे यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवणे तसेच अंमली पदार्थविरोधी आणि सायबर गुन्हेगारीविषयी जनजागृतीसारखे विविध उपक्रम यशस्वीपणे राबविले. त्यांच्या कार्यक्षम नेतृत्वाची आणि सेवाभावाची दखल घेत त्यांना सहाय्यक पोलीस आयुक्तपदी पदोन्नती देण्यात आली आहे. त्यांच्या या यशाबद्दल पोलीस अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांकडून अभिनंदन करण्यात येत असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top