पनवेल, दि.19 (वार्ताहर) ः एका इसमाचा मृतदेह कळंबोली वसाहत परिसरातील पुरुषार्थ पेट्रोल पंप ब्रीजच्या जवळ आढळून आला आहे.

सदर इसमाचे अंदाजे वय 40 ते 45 वर्ष, डी कंपोज झालेला मृतदेह असून, सदर ठिकाणी हगणदारी असल्याने व मृतदेहाचे पॅन्टचे हुक खोलले असल्याने तो शौचास गेला असावा असा कळंबोली पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

याबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी कळंबोली पोलीस ठाणे 022-27423000 किंवा स.पो.नि.अजय चव्हाण फोन नं.9870291026 येथे संपर्क साधावा.
