पनवेल, दि.19 (वार्ताहर) ः घराबाहेर चक्कर मारुन येतो असे सांगून घराबाहेर पडलेला एक इसम अद्याप घरी न परतल्याने तो हरविल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

राजकुमार शेळके (58 रा.पळस्पे गाव) रंग सावळा, उंची 5 फुट 8 इंच, बांधा मध्यम, चेहरा गोल, डोक्याचे केस सफेद व काळे असून अंगात पायजमा व नेहरु शर्ट सफेद रंगाचा घातलेला आहे. तसेच पायात चप्पल आहे. त्यांना मराठी, हिंदी भाषा अवगत आहे. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाणे 022-27452333 किंवा पो.हवा.अतुल देवकर यांच्याशी संपर्क साधावा.
