पनवेल, दि.19 (वार्ताहर) ः राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता एक विवाहिता कुठेतरी निघून गेल्याने ती हरविल्याची तक्रार कळंबोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

सना बानो खुर्शीद आलम शहा (26 रा.कळंबोली) रंग गोरा, चेहरा गोल, नाक सरळ, नाकात नथनी, उंची अंदाजे 5 फुट 7 इंच, अंगाने मध्यम, डोळे काळे व मोठे, डोक्याचे केस काळे व लांब असून अंगात मेहंदी रंगाचा सलवार कुडता व त्यावर काळ्या रंगाचा बुरखा, पायात बारीक चांदीचे पैंजण व काळ्या रंगाचे बुट सोबत गोल्डन रंगाची पर्स आहे.

तिला हिंदी व उर्दु भाषा अवगत आहे. या महिलेबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी कळंबोली पोलीस ठाणे फोन नं.022-27423000 किंवा पो.हवा.जे.पी.पाटील यांच्याशी संपर्क साधावा.
