नवीन बातम्या
GJS 2026 दिवाळी आवृत्तीचे उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन
SCI भारताच्या सागरी महत्त्वाकांक्षेचा आधारस्तंभ : सोनोवाल
*बनावट नंबर प्लेट चा वापर करून विनयभंग व अपघात करणारा थार चालक यास अवघ्या 10 तासात ताब्यात घेतलेबाबत*
पनवेलच्या सांगुर्ली जिल्हा परिषद शाळेची यशोगाथा राष्ट्रीय पोर्टलवर‌.मुख्याध्यापिका मानसी भोसले यांच्या लेखणीतून उलगडला शैक्षणिक परिवर्तनाचा प्रेरणादायी प्रवास
पनवेलमध्ये त्वचा, केस, लेझर व एस्थेटिक केअरसाठी अत्याधुनिक ‘Skinourish’चे उद्घाटन
पनवेलच्या गुलाब बागवानची दिल्लीपर्यंत भरारी
नित्याज जेम्स अँड ज्वेलरीचा आयपीओ ३० सप्टेंबरला खुला
सज्ज आहेत माझे हात : अपोलो हॉस्पिटल्सच्या सीपीआर मोहिमेची विश्वविक्रम नोंद 30 दिवसांत 61,221 नागरिकांनी घेतली सीपीआर शिकण्याची शपथ
CREDAI MCHI YOUTH NMR कडून नवी मुंबई व रायगडमध्ये ‘Ease of Doing Redevelopment (EODR) 2.0’ची घोषणा

GJS 2026 दिवाळी आवृत्तीचे उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन

4kNews कामोठे

मुंबई, दि. 4 (अजित मोहिते) : ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिल (GJC) आयोजित इंडिया जेम अँड ज्वेलरी शो (GJS 2026 दिवाळी आवृत्ती)च्या १०व्या पर्वाचे उद्घाटन महाराष्ट्राचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे झाले. हे प्रदर्शन ४ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार असून, देश-विदेशातील ज्वेलर्स, डिझायनर्स, खरेदीदार आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले आहेत.



उद्घाटनप्रसंगी IAGESचे अध्यक्ष श्रीनिवास इंजेटी, यूपी सराफा असोसिएशनचे अध्यक्ष महेश जैन, JJSचे अध्यक्ष राजीव जैन, GJCचे अध्यक्ष राजेश रोकडे, उपाध्यक्ष अविनाश गुप्ता, GJSचे संयोजक व GJCचे माजी अध्यक्ष सैयम मेहरा यांच्यासह उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
उदय सामंत यांनी GJSच्या माध्यमातून भारतीय दागिने उद्योगातील परंपरा, कारागिरी आणि नवकल्पनांना एकाच व्यासपीठावर संधी मिळत असल्याचे नमूद केले. तसेच देशातील ज्वेलर्स, उद्योजक आणि कारागिरांना सक्षम करण्यासाठी GJCच्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.



GJCचे अध्यक्ष राजेश रोकडे यांनी हे प्रदर्शन भारतीय दागिने उद्योगासाठी महत्त्वपूर्ण व्यासपीठ असल्याचे सांगितले. तर उपाध्यक्ष अविनाश गुप्ता यांनी सणासुदीच्या काळातील वाढती मागणी आणि ग्राहकांच्या बदलत्या पसंती लक्षात घेता नव्या डिझाइन्स व उत्पादनांसाठी GJS महत्त्वाचे ठरत असल्याचे सांगितले. 



विविध दागिन्यांचे प्रदर्शन
GJSमध्ये सोने-चांदीचे दागिने, डायमंड ज्वेलरी, लूज डायमंड्स, रत्न-मोती, लॅब-ग्रोवन डायमंड्स व ज्वेलरी तसेच संबंधित मशिनरी आणि उत्पादनांचे प्रदर्शन करण्यात आले आहे. भारतीय दागिने उद्योगाच्या समृद्ध परंपरेसोबत आधुनिक तंत्रज्ञान व नवकल्पनांचे दर्शन या प्रदर्शनातून घडत आहे. 



GJCविषयी : ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिल ही देशातील रत्न व दागिने उद्योगाच्या विकासासाठी कार्यरत राष्ट्रीय व्यापार परिषद असून, सरकार आणि उद्योग क्षेत्रामधील दुवा म्हणून संस्था काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top