नवीन बातम्या
पनवेल महापालिकेच्या स्वतंत्र परिवहन सेवेला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा तीव्र विरोध; ‘आधी पाणी, रस्ते आणि पार्किंगच्या समस्या सोडवा’
एसआयआर मोहिमेत बूथस्तरीय अधिकारी घरोघरी न पोहोचल्याचा आरोप; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निवेदन
उलवेच्या समिक्षा मढवीची चमकदार कामगिरी;
रायगडमध्ये चौथा तर पनवेल तालुक्यात प्रथम क्रमांक
उलवे शहर मनसे तर्फे सत्कार.
सापडलेली तीन लाखांची बॅग प्रामाणिकपणे पोलिसांच्या स्वाधीन; महिलेचे साहित्य सुखरूप परत
कॉक्रोच जनता पार्टीच्या मुंबईकर कॉक्रोचेसच्या संघटनात्मक कार्याचा आढावा
गरजू विद्यार्थ्यांना रोटरी क्लब पनवेल सनराईझचा शैक्षणिक मदतीचा हात
युवकांसाठी ‘व्हिजन भारत – जेन झी : संवाद ते संकल्प’ कार्यक्रम; भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती
पनवेलचे अनिरुद्ध (मंदार) भिडे यांना आकाशवाणी मुंबईकडून सुगम संगीतासाठी ‘ए ग्रेड’ गायकाचा मान
गायन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल; गुरुजनांसह आई-वडील, पत्नी, कुटुंबीय व शुभचिंतकांप्रती व्यक्त केली कृतज्ञता
विभाजन विभीषिका दिनानिमित्त पनवेलमध्ये डॉ. उदय निरगुडकर यांचा विशेष संवाद
‘१९४७ ची फाळणी आणि आजची वैचारिक फाळणी; नेमकं काय घडलं?’ या विषयावर होणार विचारमंथन

वीज कंत्राटी कामगारांच्या समस्यांवर लवकरच तोडगा – महावितरण संचालक राजेंद्र पवार यांचे आश्वासन





भारतीय मजदूर संघाच्या ७० व्या वर्धापन दिनानिमित्त ‘संदेश यात्रा’द्वारे कंत्राटी कामगारांमध्ये जनजागृती.
बैठकीत रायगड जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांचा समावेश

उरण दि १(विठ्ठल ममताबादे )
महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीची बैठक ३१ मे व १ जून २०२५ रोजी पुण्यातील विश्वकर्मा भवन येथे पार पडली. या बैठकीला राज्यभरातील २८ जिल्ह्यांतील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या बैठकीला रायगड जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते




या बैठकीत महावितरणच्या मानव संसाधन विभागाचे संचालक मा. राजेंद्र पवार यांनी विशेष उपस्थिती दर्शवून कामगारांच्या अडचणी ऐकून घेतल्या. “वीज कंपनीच्या उन्नतीमध्ये कंत्राटी कामगारांचा मोठा वाटा असून, कंत्राटदारांकडून त्यांना होणाऱ्या अन्यायातून मुक्त करण्यासाठी महावितरणकडून ठोस पावले उचलण्यात येतील,” असे आश्वासन त्यांनी दिले.बैठकीत भारतीय मजदूर संघाचे महाराष्ट्र व गोवा प्रभारी मा. सि. वि. राजेशजी यांचीही उपस्थिती होती.



ऊर्जामंत्र्यांच्या घोषणांवर अंमलबजावणीचा अभाव:-
संघाचे प्रदेश अध्यक्ष निलेश खरात यांनी बैठकीत नमूद केले की, “ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑगस्ट २०२४ मध्ये ४२००० कंत्राटी वीज कामगारांसाठी जाहीर केलेले लाभ अजून प्रत्यक्ष अंमलात आलेले नाहीत. प्रशासनाने अद्याप त्या निर्णयांची अंमलबजावणी न केल्यामुळे शेवटच्या कामगारापर्यंत लाभ पोहोचलेले नाहीत.” त्यांनी असेही प्रश्न उपस्थित केला की, “प्रशासन आर्थिक हितसंबंधांमुळे दोषी कंत्राटदारांना पाठीशी घालत आहे का?” यामुळे ऊर्जामंत्र्यांची प्रतिमा  मलिन होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.



संघाचे प्रदेश सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी सांगितले की, जर कामगारांच्या मागण्यांकडे सरकारने गांभीर्याने लक्ष दिले नाही, तर येत्या ३० जूनपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनादरम्यान राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येईल.






‘संदेश यात्रा’द्वारे जनजागृती अभियान:-
भारतीय मजदूर संघाच्या ७० व्या वर्धापन दिनानिमित्त ‘कंत्राटी कामगार संदेश यात्रा’ देशभरात राबवली जाणार आहे. या मोहिमेअंतर्गत विविध क्षेत्रांतील कंत्राटी कामगारांशी थेट संपर्क साधून मेळावे व संवाद सत्र आयोजित केले जातील. वीज, जलसंपदा, आरोग्य, परिवहन, बांधकाम यासारख्या क्षेत्रांतील कामगारांमध्ये संघटनात्मक बळकटी आणि हक्कांविषयी जागृती हे या उपक्रमाचे उद्दिष्ट असेल.

बैठकीचा समारोप करताना कंत्राटी कामगार,  शोषण मुक्त कामगार या करिता संघर्ष करण्याचे आवाहन भारतीय मजदूर संघ क्षेत्रीय संगठन सचिव सी व्ही राजेश यांनी मार्गदर्शन करताना व्यक्त केला आहे.आभार प्रदर्शन कोशाध्यक्ष सागर पवार यांनी केले आहे. या बैठकीला रायगड जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top