पनवेल ता.8(बातमीदार) पनवेल महापालिकेमार्फत सिडको वसाहती मधून नवीन रस्ते बांधणी सुरू आहे.त्या अनुषंगाने कळंबोली येथील केएलई कॉलेज ते विसर्जन तलाव रोडपाली, मार्गावर काँक्रिटीकरण न करता डांबरीकरण करण्याची मागणी मा. नगरसेवक खानावकर यांनी पालिकेकडे केली आहे.

अदर्श शहराचे स्वप्न साकारणाऱ्या पनवेल महापालिकेने विविध विकास कामामध्ये प्रामुख्याने पनवेल महापालिका क्षेत्रातील सिडको नोडमधील रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्याचे काम गेल्या वर्षभरापासून पालिकेने हाती घेतली आहे. त्यामुळे कॉलनीतील मुख्य रस्ते खड्डेमुक्त होणार आहेत. त्याच बरोबर ‘कळंबोली नोड मधील विविध रस्त्यांचे काँक्रीटीकरण व पुनर्पृष्ठीकरण’, करण्याचे काम कासव गतीने सुरू आहे.

याच कामाचा भाग असलेल्या केएलई कॉलेज ते विसर्जन तलाव रोडपाली, मार्गावर काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. परंतु आधीच समुद्र सपाटीपासून खोल असलेली वसाहत या उंच काँक्रिटीकरणामुळे पुन्हा जलमय होणार आहे. त्यामुळे या बैठ्याचाळीलगत असलेल्या रस्त्यावरचे काँक्रिटीकरण काँक्रिटीकरणामुळे उंची वाढणार आहे.

त्यामुळे ठिकाणाहून पाण्याचा निचरा होण्यासाठी जागा उरणार नाही. परिणामी नेहमीच पावसाळ्यात जलमय होणाऱ्या या बैठक चाळीतील घरांना आणखी पावसाळ्यात घरात पाणी शिरण्याचा त्रास होणार आहे. ही बाब नगरसेवक विजय खानावकर यांच्यासह बैठ्या चाळीतील नागरिकांनी पनवेल पालिकेच्या लक्षात आणून दिली असून या ठिकाणी सिमेंटचा रस्ता न बांधता पूर्वीच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी माजी नगरसेवक विजय खानावकर व नागरिकांनी पनवेल पालिकेचे मुख्य अभियंता संजय कटेकर यांच्याकडे केली आहे. यावेळी प्रभाग क्रमांक दहा मधील बैठ्या चाळीतील महिला व नागरिक उपस्थित होते.
