पनवेल, दि.23 (4kNews) ः एका महिलेची हत्या करून जबरी चोरी करणार्या आरोपीस अडीच महिन्यानंतर गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलच्या पथकाने अथक मेहनत घेवून ताब्यात घेतल्याने या खुनाची उकल झाली आहे. सदर घटना ही पनवेल तालुक्यातील वलप गावामध्ये घडली होती.

पनवेल तालुका पोलीस ठाणे हदिद्तील वलप गावातील महिला सौ.संगिता राजेंद्र आगवणे, वय 49 वर्षे हया दिनांक 07/10/2024 रोजी खाजगी शिकवणीचे क्लास संपवुन घरी पायी चालत जात असताना कोणीतरी अज्ञात आरोपी इसमाने जबरी चोरी करण्याचे उदद्ेशाने त्यांचा गळा आवळुन खुन करून त्यांचे अंगावरील सोन्याचे मंगळसुत्र, कानातील झुमके व सोनसाखळया, पोको कंपनीचा मोबाईल व पर्स असे एकुण 1,95,850/- रूपये किंमतीचे ऐवज चोरी करून नेले म्हणून पनवेल तालुका पोलीस ठाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पनवेल तालुका पोलिसांचे पथक तसेच गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेलचे पथक समांतर करीत होते. एखादया महिलेचा अशा प्रकारे निघृण खुन करून तिचे अंगावरील सोन्याचे दागिने, मोबाईल फोन व पर्स जबरी चोरी झाल्याने आयुक्तालय हदिद्तील पुरूष, महिला, जेष्ठ नागरीक यांचे मनात भिती व असुक्षिततेचे वातावरण निर्माण झाल्याने अशा प्रकारचा गंभिर गुन्हा तात्काळ उघडकिस आणणेबाबत पोलीस आयुक्त, मिलिंद भारंबे, अपर पोलीस आयुक्त, (गुन्हे) दिपक साकोरे, पोलीस उप आयुक्त, (गुन्हे) अमित काळे यांनी आदेशीत केले होते.

त्यानुसार सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने अजयकुमार लांडगे, सहा.पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उमेश गवळी यांचे नेतृत्वाखाली गुन्हे शाखा कक्ष 02 कडील अधिकारी व अंमलदार यांची पथके तयार करून गुन्हयाचा समांतर तपास सुरु केला. सदर घटना दिनांक 07/10/2024 रोजी सायंकाळी 19:00 ते 19:30 वाजताच्या दरम्यान घडली असल्याने तसेच गुन्हयाचे घटनास्थळ हे निर्जन ठिकाणी असल्याने गुन्हयात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार मिळुन येत नव्हते. तसेच घटनास्थळाच्या आजुबाजुस सीसीटिव्ही फुटेज नसल्यामुळे आरोपीबाबत निश्चित माहिती मिळण्यात अडचणी येत होत्या. सदर गुन्हयाचा तांत्रिक तपास करीत असताना परिसरातील वेगवेगळ्या राज्यातून आलेल्या कामगारांची व लोकांची माहिती घेतली असता यातील एक इसम हा या घटनेनंतर रिवा, मध्यप्रदेश येथे निघून गेल्याचे निष्पन्न झाल्याने सदर ठिकाणाची माहिती घेवून पोलिसांचे एक पथक त्या ठिकाणी रवाना झाले व त्यांनी तेथून वलप गावात राहणारा आरोपी इसम नामे शरद घनश्याम साहु, ( वय 45 वर्षे, रा.वलप गाव) याला ताब्यात घेतले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यानुसार त्याला पनवेल येथे आणण्यात आले आहे. सखोल आणि कौशल्यपुर्ण तपासात सदर महिलेचा खुन त्याने केले असल्याचे निष्पन्न झाले.

गुन्हे शाखा कक्ष 02, पनवेल, नवी मुंबई चे पथकाने सदरचा गुन्हा दाखल झाल्यापासुन अविश्रांतपणे अथक परिश्रम करुन सदरचा गुन्हा करणार्या आरोपी इसमाबाबत काहीएक माहिती नसताना देखिल गुन्हयाचा सतत व चिकाटीने कौशल्यपुर्ण तपास करून आरोपीस अटक करुन गुन्हा उघडकीस आणुन उत्कृष्ट कामगिरी केली आहे. आरोपीस पुढिल कार्यवाहीकामी पनवेल तालुका पोलीस ठाणे यांचे ताब्यात देण्यात आले असून पुढिल तपास पनवेल तालुका पोलीस ठाणे करीत आहेत. सदर आरोपीस 26/12/2024 रोजी पर्यंत पोलीस कोठडी मंजुर आहे. सदरची यशस्वी कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गवळी, सपोनि प्रविण फडतरे, अजित कानगुडे, पोउनि मानसिंग पाटील, प्रताप देसाई, अभयसिंह शिंदे, पोलीस हवालदार रमेश शिंदे, अनिल पाटील, प्रशांत काटकर, मधुकर गडगे, तुकाराम सुर्यवंशी, रणजित पाटील, निलेश पाटील, दिपक डोंगरे, इंद्रजित कानु, रूपेश पाटील, सागर रसाळ, अजित पाटील, पोलीस नाईक अजिनाथ फुंदे, पोलीस शिपाई विक्रांत माळी, लवकुश शिंगाडे, महिला पोलीस हवालदार जगदीश तांडेल, पोलीस शिपाई अमोल मोहिते, कुंभफळे, महिला पोलीस शिपाई अदिती काकडे, मनिशा केदार यांनी केलेली आहे.

