नवीन बातम्या
उत्तर रायगड जिल्हा भाजप कार्यकारणीची मासिक बैठक संपन्न
कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या सेवेसाठी प्रभाकर जोशी दाम्पत्याचा इस्कॉनतर्फे सन्मान
आमदार प्रशांत ठाकूर यांची महावितरण कार्यालयात धडक
खंडित वीजपुरवठ्याबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारत व्यक्त केली नाराजी
बदलत्या काळातील पालकत्व”  या विषयावर बालरोग संघटनेतर्फे पालक शिक्षकांकरिता विशेष चर्चा सत्र
*वेदनामुक्त आयुष्याचा नवा प्रवास; मेडिकव्हरच्या ‘मुव्हमेंटम २०२६’ला उत्स्फूर्त प्रतिसाद*
धरणा गावातील गटारपाण्याच्या समस्येवर माजी सरपंच नंदकुमार म्हात्रे यांच्या पाठपुराव्याने तातडीने उपाययोजना
हंगरफ्रीवर्ल्ड’ उपक्रमाने दैनंदिन अन्न वितरण मोहिमेच्या परिवर्तनात्मक प्रभावावर प्रकाश
केडिऐजीबी ग्रुप आणि ओरायन मॉलच्या रक्तदान शिबीराला ऊदंड प्रतिसाद; २०५ पनवेलकरांनी केले रक्तदान
जलजीवन’ फेल ठरल्यानंतर सरपंचांच्या संकल्पनेतून चिंचवाडीचा पाणीप्रश्न सुटणार; माथेरानच्या कपारीत शोधला पाण्याचा स्त्रोत

*नवी मुंबईतील मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये लिव्हर क्लिनिकचा शुभारंभ*




4kNews दि. 18
यकृतासंबंधीत आजारांचे वेळीच निदान व व्यवस्थापनासाठी हॉस्पिटलचा पुढाकार
*नवी मुंबई :* फॅटी लिव्हर, हिपॅटायटीस तसेच मद्यपानामुळे यकृताचे होणारे नुकसान आणि मेटाबॉलिक लिव्हर डिसॲार्डर यांसारख्या लिव्हरशी संबंधित आजारांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. यासाठी मेडिकव्हर हॉस्पिटलने पुढाकार घेत नवी मुंबईत लिव्हर क्लिनिक सुरू केले आहे. या क्लिनिकद्वारे लिव्हर आजारांचे वेळीच निदान, उपचार आणि दीर्घकालीन व्यवस्थापनासाठी स्क्रिनिंग व निदान सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
सध्या मधुमेह, लठ्ठपणा, हायपोथायरॉईडीझम, बैठी जीवनशैली, मद्यपान, व्हायरल हिपॅटायटीस बी व सी, ऑटोइम्यून लिव्हर डिसीज आणि अनुवंशिक लिव्हर डिसॲार्डरमुळे यकृताचे नुकसान होण्याचा धोका वाढतो. अनेक रुग्णांमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही लक्षणे दिसत नाहीत आणि त्यामुळे या आजाराच्या निदानास विलंब होतो. उपचारास उशीर झाल्याने लिव्हर फायब्रोसिस, सिरोसिस किंवा लिव्हर फेल्युअर सारख्या गुंतागुंती निर्माण होतात. दुर्लक्ष केल्यास लिव्हरचे आजार हळूहळू वाढत जाऊन त्याचा एकूण आरोग्यवर आणि एखाद्या जीवनमानावर गंभीर परिणाम होतो. 



हे लिव्हर क्लिनिक यकृताच्या आरोग्याच्या तपासणीसाठी सर्वसमावेशक दृष्टिकोन प्रदान करते. यकृताच्या गंभीर विकारांचा धोका असलेले रुग्ण ओळखून त्यांची वेळोवेळी तपासणी, सविस्तर वैद्यकीय मूल्यांकन आणि प्रगत निदान चाचण्या केल्या जातात. या क्लिनिकमध्ये आधुनिक उपचार पद्धतींद्वारे यकृताचे आजार सुरुवातीच्या टप्प्यात ओळखून त्याची भविष्यातील गुंतागुंत रोखण्यावर भर दिला जातो. विशेषतः मधुमेह, लठ्ठपणा, हायपोथायरॉईडीझम, मद्यपान, हिपॅटायटीस बी किंवा सी संसर्ग, तसेच कुटुंबात यकृतासंबंधी आजारांचा वैद्यकीय इतिहास असलेले आणि ऑटोइम्यून लिव्हर डिसीज असलेल्या व्यक्तींनी या स्क्रिनिंगचा लाभ घ्यावा. उच्च जोखमीच्या रुग्णांमध्ये प्रतिबंधात्मक उपायांवरही याठिकाणी भर दिला जाईल.



या क्लिनिकमध्ये लिव्हरच्या तपासणीसाठी फायब्रोस्कॅन, लिव्हर फंक्शन टेस्ट (LFT), कंप्लीट ब्लड काउंट (CBC), ट्रिपल मार्कर टेस्ट आणि निवडक रुग्णांसाठी अल्ट्रासाऊंड अॅब्डोमेन सारख्या चाचण्या केल्या जातात. या चाचण्यांमुळे लिव्हरमध्ये चरबीचे प्रमाण, सूज, फायब्रोसिस आणि लिव्हरच्या एकूण कार्यक्षमतेचे मूल्यांकन करता येते.
*डॉ. दिपक अहिरे (गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट, हेपॅटोलॉजिस्ट आणि एंडोस्कोपिस्ट, मेडिकव्हर हॉस्पिटल्स, खारघर ) म्हणाले,* बऱ्याचदा यकृतासंबंधी आजाराचे सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीच लक्षणं दिसून येत नाहीत, त्यामुळे असे रुग्ण आमच्याकडे उपचारासाठी येतात तेव्हा आजार पुढच्या टप्प्यात पोहोचलेला असतो. मधुमेह, लठ्ठपणा, थायरॉईड विकार, मद्यपान, व्हायरल हिपॅटायटीस आणि अनुवांशिक कारणे ही यकृताच्या झालेल्या नुकसानाची प्रमुख कारणं आहेत. या लिव्हर क्लिनिकद्वारे यकृतासंबंधी आजारांचा धोका असलेल्या व्यक्ती ओळखून त्यांच्यावर वेळीच उपचार देण्याचा प्रयत्न करत आहोत. वेळीच तपासणी आणि जीवनशैलीत बदल केल्यास सिरोसिस आणि लिव्हर फेल्युअरसारख्या गंभीर गुंतागुंती टाळता येऊ शकतात.



*डॉ. रावसाहेब राठोड (गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट, हेपॅटोलॉजिस्ट आणि थेरप्युटिक एंडोस्कोपिस्ट, मेडिकव्हर हॉस्पिटल्स, खारघर) सांगतात की,* अनेक यकृताचे आजार हे योग्य वेळी निदान झाल्यास टाळता येऊ शकतात किंवा ते नियंत्रणात आणता येतात. लिव्हर क्लिनिकमध्ये फायब्रोस्कॅन, लिव्हर फंक्शन चाचण्या आणि आवश्यकतेनुसार इमेजिंग सारख्या प्रगत निदान पद्धतींचा वापर केला जातो. त्वरित उपचारांसोबतच जीवनशैलीत बदल, आहार मार्गदर्शन आणि नियमित फॉलो-अपवरही भर दिला जातो. आमचे उद्दिष्ट हे केवळ आजारावर उपचार करणे नाही, तर त्याची प्रगती रोखून दिर्घकाळासाठी रुग्णांच्या यकृताचे आरोग्य सुधारण्याचा प्रयत्न केला जातो.

*डॉ. विक्रम धारप,( गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट, हेपॅटोलॉजिस्ट आणि थेरप्युटिक एंडोस्कोपिस्ट,मेडिकव्हर हॉस्पिटल्स, खारघर) म्हणाले की,* आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे कोणतीही लक्षणं न दिसता वाढणारे यकृताचे आजार हा एक चिंतेचा विषय ठरत आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक चाचणी, संतुलित आहार, नियमित व्यायाम करणे तसेच मद्यपानावर सारख्या व्यसनांपासून दूर राहणे अत्यंत गरजेचे आहे. या लिव्हर क्लिनिकच्या माध्यमातून आम्ही केवळ उपचारच नाही, तर जनजागृती आणि प्रतिबंधावरही तितकाच भर देत आहोत, जेणेकरून रुग्णांना गंभीर अवस्थेपर्यंत पोहोचण्यापूर्वीच या अशा आजारांना आळा घालता येईल.



*संदीप जोशी , सेंटर हेड- मेडिकव्हर हॉस्पिटल्स, नवी मुंबई सांगतात की,* मेटाबॉलिक आणि जीवनशैलीशी संबंधित यकृताच्या आजारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे पहायला मिळते. यासाठी वेळीच तपासणी आणि उपचारांची गरज लक्षात घेता लिव्हर क्लिनिकच्या माध्यमातून मेडिकव्हर हॉस्पिटलने तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सुलभ आणि दर्जेदार सेवा पुरव निश्चय
केला आहे, ज्यामुळे नागरिकांना यकृतासंबंधी आजार वेळीच ओळखून निरोगी जीवन जगता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top