4k समाचार
उरण दि 9 (विठ्ठल ममताबादे )
कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य कला महाविद्यालय उरण रायगड मध्ये दिनांक ७ ऑगस्ट २०२५ रोजी एक दिवसीय कृत्रिम बुद्धिमत्ता यावर सकाळी नऊ ते दुपारी बारापर्यंत कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कृत्रिम बुद्धिमत्ता समजून घेणे व त्याला घाबरून न जाता विद्यार्थी व शिक्षक यांनी ती आत्मसात करून तिचा योग्य वापर करता आला पाहिजे असे विचार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वाल्मीक गर्जे यांनी मांडले कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्रमुख वक्ते प्रदीप कश्यप कृत्रिम बुद्धिमत्ता डिझायनर यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता काय आहे,

हे कौशल्य आपल्या पारंपरिक शिक्षणाबरोबर कसे आत्मसात केले पाहिजे याबाबत मार्गदर्शन केले.त्या बाबतीतले योग्य ते प्रशिक्षण घेऊन विद्यार्थी आपले करिअर घडवू शकतात. शिक्षकाने देखील शिकविताना संशोधन करताना कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर कसा योग्य रीतीने करावा, याबाबतीत उपस्थितांना त्यांनी मार्गदर्शन केले. सदर कार्यशाळे करिता महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. वाल्मीक गर्जे, प्रा. डॉ.एम. जी. लोणे, प्रा. डॉ. पराग कारुळकर, अंतर्गत गुणवत्ता हमी सेलचे प्रमुख प्रा. डॉ. अरुण चव्हाण, प्रा. रियाज पठाण, प्रा. पूजा गुप्ता,प्रा. विनिता तांडेल व इतर प्राध्यापक व महाविद्यालयातील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यशाळेचा समारोप प्रा. हन्नत शेख यांच्या आभार प्रदर्शनाने झाला.
