4k समाचार
उरण दि २7 (विठ्ठल ममताबादे )
रायगड जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांचे विश्वासू सहकारी अजित ठाकूर यांची भेंडखळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. गणेश उत्सवाच्या एक दिवस अगोदर, दिनांक २६ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी २.०० वाजता मान्यवरांच्या उपस्थिती उपसरपंच पदाचा पदभार स्विकारला.अजित ठाकूर हे कॉंग्रेस पक्षाचे तडफदार युवा नेते आहेत. रायगड जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वाखाली ते राजकीय, सामाजिक तसेच कामगार क्षेत्रात काम करत आहेत. तरुणांना नोकरीत प्राधान्य तसेच कामगारांना न्याय देण्यासाठी ते नेहमीच अग्रेसर असतात जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांचे विश्वासू सहकारी असल्यामुळे त्यांना हि जबाबदारी सोपविण्यात आली. जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या पदग्रहण समारंभा प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मिलिंद पाडगावकर, उरण तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे, अल्पसंख्यांक अध्यक्ष अखलाक शिलोत्री, रायगड जिल्हा इंटक अध्यक्ष किरीट पाटील, उरण तालुका इंटक अध्यक्ष संजय ठाकूर, जेष्ठ काँग्रेस नेते जयवंत पाटील, दिपक ठाकूर, परशुराम भोईर, महाराष्ट्र युवा इंटक उपाध्यक्ष लंकेश ठाकूर, उरण तालुका युवा इंटक अध्यक्ष राजेंद्र भगत, प्रमोद ठाकूर, रमेश ठाकूर, सुरेश ठाकूर, मनीष ठाकूर, साई पाटील, तुळशीदास म्हात्रे, अमोल ठाकूर, वैभव ठाकूर, विशाल कवाडे. तसेच मोठ्या संखेने कॉंग्रेस कार्यकर्ते व भेंडखळ ग्रामस्थ उपस्थित होते.

अजित वासुदेव ठाकूर हे २०१० पासून राजकारणात सक्रिय आहेत.राजकारणात येण्यापूर्वी अजित ठाकूर यांनी अनेक विविध सामाजिक उपक्रम राबवून गोरगरिबांना मदत केली आहे.गोरगरिबांच्या सुखदुःखात सहभागी होत अनेकांना सढळ हाताने कोणत्याही स्वार्थ न ठेवता मदत केली आहे.अजित ठाकूर यांचे आई वडील हे काँग्रेसचे कट्टर व एकनिष्ठ, प्रामाणिक कार्यकर्ते होते.त्यांनीही आदर्श राजकारण करून नावलौकिक मिळविला. आई वडिलांचा आदर्श वारसा, राजकीय वारसा अजित ठाकूर यांनी तसेच पुढे चालू ठेवला आहे. ग्रामविकास आघाडी तर्फे अजित ठाकूर यांनी उपसरपंच पदासाठी अर्ज भरला होता. उपसरपंच पदासाठी एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने प्रशासनाने सरपंच, सर्व सदस्यांच्या सहकार्याने उपसरपंच पदी अजित ठाकूर यांची निवड झाल्याचे जाहीर केले.

भेंडखळ ग्रामपंचायतचे सरपंच, ग्रामपंचायतच्या सर्व सदस्यांनी अजित ठाकूर यांना उपसरपंच पदासाठी बिनविरोध जाहीर पाठिंबा दिला. या पाठिंब्यावरच अजित ठाकूर हे बिनविरोध उपसरपंच बनले आहेत. काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत,काँग्रेसचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते, ग्रामपंचायतचे सरपंच, ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, सदस्या,ग्रामस्थ,मित्रपरिवार यांचे अजित ठाकूर यांनी मनापासून आभार मानले आहेत. गावाचा जास्तीत जास्त विकास करून जनतेला मूलभूत सुख सुविधा पुरविण्याचा संकल्प यावेळी अजित ठाकूर यांनी केला आहे. भेंडखळ ग्रामपंचायतच्या माध्यमातून सरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी गावात विविध शासकीय योजना राबविले, विविध उपक्रम राबविले, गावात अनेक विकासकामे केली या सर्वच उपक्रमात, विकास कामात अजित ठाकूर यांचे नेहमीच सहभाग राहिला आहे.सर्वच उपक्रमात विकास कामात अजित ठाकूर यांचा महत्त्वाचा वाटा असल्यामुळे ग्रामस्थांनी, सरपंच,सर्व ग्रामपंचायत सदस्य, सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते या सर्वांनी नवनिर्वाचित उपसरपंच अजित ठाकूर यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
