4k समाचार
उरण दि 8(विठ्ठल ममताबादे )मैत्री ग्रुप वीर वाजेकर महाविद्यालय २००४-२००७ च्या माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालय परिसरात “माझं महाविद्यालय , माझी भेट- माझं झाड” या संकल्पनेतून वृक्षारोपण केले. हा उपक्रम राबवताना ज्या सहकाऱ्यांचा वाढदिवस असेल त्याने किमान एक झाड लावावे असे नियोजन केले होते.
त्यानुसार महाविद्यालयाच्या परवानगीने मैत्री ग्रुपने हापूस, केशर, निलम, राजापुरी, रत्ना अशा विविध जातीची ३० आंबा कलमे आणून त्याची लागवड आज सुरू केली.

याप्रसंगी प्रभारी प्राचार्य डॉ. आमोद ठक्कर यांनी मैत्री ग्रुपच्या या उपक्रमाचे कौतुक केले. माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या संपर्कात राहिले पाहिजे. सर्वांच्या सहकार्याने महाविद्यालयाचा सर्वांगीण विकास होत आहे. यात माजी विद्यार्थ्यांचे महत्वाचे योगदान मिळत असून ते या पुढेही मिळत राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी मैत्री ग्रुपच्या सदस्यांना परिसर भेट घडवत मियावाकी प्रकल्प तसेच इतर प्रकल्प उपक्रमांची माहिती दिली. यावेळी मैत्री ग्रुपचे रुपेश पाटील यांनी माझं कॉलेज माझी भेट माझं झाड उपक्रमाची माहिती दिली. पर्यावरण समतोल राखण्यासाठी अधिकाधिक वृक्षारोपण आवश्यक असून आपण सर्वांनी त्यासाठी आग्रही असले पाहिजे.

महाविद्यालयाने हा उपक्रम राबवण्यासाठी परवानगी दिल्याबद्दल महाविद्यालय प्रशासनाचे आभार मानले. या आंबा कलम लागवडीनंतर त्याची निगा संगोपन करण्याची जबाबदारी आमची आहे असे सांगताना प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच येथील विद्यार्थी देखील सहकार्य करतील असा विश्वास व्यक्त केला. तसेच यापुढेही असे विविध कार्यक्रम ग्रुपकडून राबविण्यात येतील असे सांगितले .

यावेळी प्रा. गजानन चव्हाण प्रा. राम गोसावी, प्रा. डॉ अनिल पालवे प्रा. डॉ गुरमीत वाधवा यांच्यासह मैत्री ग्रुपचे सदस्य उपस्थित होते. या उपक्रमासाठी मैत्री ग्रुपचे निलेश ठाकूर, हेमांगी पाटील, संदीप पाटील, चेतन ठाकूर, कमलाकर घरत, प्राजक्ता ठाकूर, निशा तांडेल, तन्वी घरत, जुलेखा ठाकूर, दीपिका ठाकूर, कामिनी ठाकूर, वंदना कडू, सुषमा पाटील, करुणा कोळी, दीपाली पाटील, वैजयंती कडू – तरल, दर्शन घरत, निलेश म्हात्रे, जगन पाटील, निता म्हात्रे, आशा पाटील, रजनी पाटील, समीर जोशी, समाधान जोशी, मनोहर डाकी, गणेश कोळी, मनमोहन कोळी, एड. योगेश म्हात्रे, सारिका पाटील आदीनी विशेष मेहनत घेतली. पर्यावरण संवर्धनाच्या या उपक्रमासाठी झाडे दिली आणि लागवडीसाठी सहभाग घेतला.
