नवीन बातम्या
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त नविन पनवेल भाजप मंडलाचे रक्तदान शिबिर उत्साहात
Open Channels FM: Our Guide to Open Channels FM Podcast Network’s Channels, Series, and Blog
पनवेल कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पदी देवेंद्र गंगाराम मढवी यांची  बिनविरोध निवड.
हिंदू देवी-देवतांचा अवमान केल्याचा कांबळे कुटुंबावरील आरोप खोटा; तळोजा वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण भगत यांचे स्पष्टीकरण
शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा; कर्जमाफीमुळे बळीराजाला मोठा दिलासा – नामदार ॲड. आशिष शेलार
रायगड जिल्हा किसान मोर्चातर्फे पनवेलमध्ये ‘कृतज्ञता मेळावा’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानले आभार
सन्माननीय रिपाइं नेते नरेंद्र गायकवाड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जुलै २०२६ संपूर्ण महिनाभर विविध कार्यक्रम हाती घेण्यात आले
लोकप्रतिनिधींच्या पत्रांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
नगरसेवक प्रथमेश सोमण प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर बरसले!
फिजिबिलिटी अहवालासाठी 50 हजारांची लाच; महावितरणचा सहायक अभियंता एसीबीच्या जाळ्यात
पनवेल महानगरपालिकेच्या निष्काळजी आणि बेजबाबदार कारभाराचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने केला संताप व्यक्त

पनवेलमध्ये वाहतूक कोंडी व प्रदूषणावर तोडगा; ‘पॉड टॅक्सी’ प्रकल्पाची संकल्पना पुढे; नगरसेविका सायली सरक यांचा पुढाकार

4kNews कामोठे
पनवेल  दि.23 (वार्ताहर): पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील वाढत्या वाहतूक कोंडी व प्रदूषणाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी ‘पॉड टॅक्सी’ प्रकल्पाची संकल्पना पुढे आली आहे. शिवसेनेच्या नगरसेविका सायली सरक यांनी हा अभिनव प्रस्ताव मांडला असून, शहराच्या भविष्यातील वाहतूक व्यवस्थेसाठी तो महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मानले जात आहे.


           खारघर, कामोठे, कळंबोली, नवीन पनवेल आणि पनवेल या भागांमध्ये दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असून, त्यामुळे वाहतूक कोंडी आणि वायू प्रदूषण गंभीर समस्या बनली आहे. यावर शाश्वत उपाय म्हणून पॉड टॅक्सी प्रणाली प्रभावी ठरू शकते, असे मत सायली सरक यांनी व्यक्त केले आहे. या संदर्भात त्यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. 

या प्रकल्पाबाबत सरनाईक यांनी सकारात्मक भूमिका दर्शवली असून, पनवेलमध्ये पॉड टॅक्सी सुरू करण्याबाबत अनुकूलता दाखवली आहे. तसेच, नगरसेविका सरक यांनी महापौर नितीन पाटील आणि महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांनाही यासंदर्भात निवेदन दिले आहे. शहरातील वाढती लोकसंख्या आणि वाहतुकीचा ताण लक्षात घेता, भविष्यातील गरज ओळखून पालिकेमार्फत लवकरच सर्वेक्षण करण्यात येणार असून, त्यानुसार पॉड टॅक्सी प्रकल्प राबविण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले आहे. दरम्यान, या उपक्रमावेळी कळंबोली शिवसेना शहर प्रमुख तुकाराम सरक यांच्यासह श्रीकांत फाळके, महेश गोडसे, निलेश दिसले, प्रेम डांगे, प्रेम गोडसे, सुनील खताळ, अंकित सरगर आदी शिवसैनिक उपस्थित होते. शहराच्या वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणण्याची क्षमता असलेल्या या प्रकल्पाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top