नवीन बातम्या
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन

शिवसेना नेते, माजी केंद्रीय मंत्री श्री. अनंतजी गीते साहेब यांच्या आदेशानुसार युवासेना पनवेल विधानसभा पदाधिकारी मेळावा आज महाजनवाडी हॉल, पनवेल येथे पार पडला.


4k समाचार दि. 17
येणारी महानगरपालिका तसेच जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या अनुषंगाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. निवडणुकांची तयारी, उमेदवारांचा प्रचार प्रसार, युवा सेनेचा विस्तार, मतदार यादी संदर्भातील छाननी तसेच मतदार जागरूकता आधी विषयांवर शिवसेना नेते, माजी केंद्रीय मंत्री श्री. अनंतजी गीते साहेब, शिवसेना उपनेते श्री. बबनदादा पाटील, शिवसेना संपर्कप्रमुख श्री. प्रसाददादा भोईर, शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. शिरीषदादा घरत आणि जिल्हा सल्लागार श्री. शिरीषजी बुटाला आदींनी विस्तृत मार्गदर्शन केले. तसेच यावेळी युवासेनेच्या प्रमुख नियुक्त्या सुद्धा करण्यात आल्या. 



या मेळाव्याला सह संपर्कप्रमुख श्री. अनिल चव्हाण, विधानसभा समन्वयक श्री. प्रदीप ठाकूर, महानगरप्रमुख श्री. अवचित राऊत, तालुकाप्रमुख श्री. ज्ञानेश्वर बडे, शहर प्रमुख श्री. प्रवीण जाधव, श्री. यतिन देशमुख, श्री. सदानंद शिर्के, श्री. रामदास गोवारी, श्री. प्रदीप केनी, माजी नगरसेवक श्री. अतुल पालन, श्री. संतोष गोळे, उपशहर संघटिका सौ. उज्वला गावडे, सौ. अश्विनी देसाई, शाखाप्रमुख श्री. मयुरेश पाटील आदी शिवसेना, महिला आघाडी पदाधिकारी उपस्थित होते. 



सदर मेळाव्याचे आयोजन आणि नियोजन करण्यात युवासेना जिल्हा अधिकारी श्री. पराग मोहिते यांच्यासह विधानसभा अधिकारी श्री. अजय पाटील, तालुका अधिकारी श्री. मनोज कुंभारकर, महानगर अधिकारी श्री. महेश भिसे, महानगर समन्वयक श्री. जय कुष्टे, श्री. सुशांत सावंत, शहर अधिकारी श्री. निखिल भगत, श्री. सिद्धेश गुरव आदींनी मोलाचा वाटा उचलला. तसेच यावेळी उपजिल्हाधिकारी श्री. नितीन पाटील, विधानसभा समन्वयक श्री. अरविंद कडव, महानगर चिटणीस श्री. जीवन पाटील, तालुका चिटणीस श्री. सूरज गायकर, युवती सेनेच्या कुमारी. काजोल व्हरकटे, कुमारी. लीना खडकबाण यांच्यासह युवा सेनेचे शेकडो पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top