नवीन बातम्या
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन

आगामी पनवेल महानगरपालिका हद्दीतील निवडणुकी संदर्भात स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीच्या बैठकीचे आयोजन

4kNews
पनवेल, दि. 22 ( वार्ताहर ) : स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी नुकतीच पक्षाचे अध्यक्ष सागर भाई संसारे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आणि त्यानंतर पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीविषयी चर्चा केली. त्यांच्या आदेशानुसार पक्षाच्या पनवेल महानगरपालिका हद्दीतील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक रविवार दिनांक 20 डिसेंबर 2025 रोजी महेश साळुंखे यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेली आहे.  


पनवेल महानगरपालिकेतील 20 वार्डांमध्ये स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्षाला मानणारे कार्यकर्ते आहेत. या कार्यकर्त्यांची एकत्रित बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. महेश साळुंखे हे महायुतीच्या त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या पनवेल महानगरपालिका हद्दीतील ज्येष्ठ कार्यकर्त्यांशी युतीबाबत चर्चा करत आहे.  त्याप्रमाणे कार्यकर्त्यांच्या मनातील भावना जाणून त्यानंतर आपली पक्षाची भूमिका जाहीर करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top