नवीन बातम्या
WordPress.org blog: WordPress 7.0.3 release
वाढदिवसाचे सामाजिक औचित्य! महेश साळुंखे यांच्या पुढाकाराने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
How to Price Your Online Course: One-Time vs Subscription vs Membership
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत भारतीय मजदूर संघाच्या प्रतिनिधींची विविध कामगार प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक संपन्न.
ऑल इंडिया एअरपोटर्स एव्हिएशन एम्प्लॉईज युनियनच्या उपाध्यक्षपदी बाळासाहेब नाईक यांची नियुक्ती
लोकनेते रामशेठ ठाकूर हे समाजसेवेतील ‘हिरा’; त्यांच्या नेतृत्वाने जनार्दन भगत शिक्षण संस्थेने महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवला –  आमदार रविशेठ पाटील
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भागूबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉच्या भव्य मूट कोर्टचे उद्घाटन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त शास्त्रीय संगीताच्या मार्गदर्शनपर प्रात्यक्षिकाने रंगली सुरेल मैफल; विदुषी शुभदा पराडकर यांचे शास्त्रीय संगीतप्रेमी व युवा कलाकारांना मोलाचे मार्गदर्शन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त बालग्रामला जीवनोपयोगी वस्तूंची मदत
रुचिता लोंढे-समेळ यांचा स्तुत्य उपक्रम; ‘फुलं-हारांऐवजी लोकोपयोगी कामात सहभागी व्हा’ या आवाहनाला प्रतिसाद
पनवेलचे लोकप्रिय आमदार मा. श्री. प्रशांत ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात (अधिकारप्रदत्त स्वायत्त) शनिवार, दि. ८ ऑगस्ट रोजी ‘भव्य रोजगार मेळावा २०२६’चे आयोजन

महायुती किंवा महाविकास आघाडी यांच्यापैकी जो आमच्या पक्षाला सन्मानाची वागणूक देईल त्याच पक्षाला पाठिंबा देणार – स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे

4kNews
पनवेल, दि . २२ ( वार्ताहर ) : स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक महेश साळुंखे यांच्या निवासस्थानी संपन्न झाली.  या बैठकीमध्ये पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कोणाला पाठिंबा द्यायचा याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.  त्यावेळी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी महेश साळुंखे यांना पाठिंबा देण्याबाबतचे सर्व अधिकार दिलेले आहेत.  पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अशीही मागणी केलेली आहे की महायुती किंवा महाविकास आघाडी यांच्यापैकी जो आपल्या पक्षाला सन्मानाची वागणूक देईल त्याच पक्षाला पाठिंबा देण्यात यावा अन्यथा अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देण्यात यावा. 


   पनवेल महानगरपालिकेच्या 20 वार्डांपैकी 18, 19, 20 या वार्डांमध्ये पक्षाची चांगल्या प्रकारची ताकद आहे आणि ही ताकद उमेदवार निवडून आणण्याकरिता निर्णायक मतदार ठरू शकतात.  त्याचप्रमाणे कामोठे विभाग , खांदा कॉलनी,  नवीन पनवेल , कळंबोली या ठिकाणी सुद्धा पक्षाची चांगल्या प्रकारची ताकद आहे.  जर पक्षाच्या कार्यकर्त्यांना या निवडणुकीमध्ये सन्मानाची वागणूक मिळाली नाही तर पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष म्हणून महेश साळुंखे जो निर्णय घेतील तो पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना मान्य राहणार आहे अशी ग्वाही सर्व कार्यकर्त्यांनी दिलेली आहे.  लवकरच महायुती किंवा महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला पाठिंबा द्यायचा याविषयी दोन्ही गटाच्या वरिष्ठांशी महेश साळुंखे चर्चा करत आहेत आणि लवकरच कोणाला पाठिंबा द्यायचा याविषयी निर्णय साळुंखे जाहीर करतील.  या बैठकीमध्ये . अध्यक्ष, पनवेल विधानसभा मतदारसंघ.निलेश कांबळे, अध्यक्ष, पनवेल तालुका दिलीप नाईक, 


, उपाध्यक्ष पनवेल तालुका  नरेश परदेशी ,अध्यक्ष पनवेल शहर   मनोज कांबळे अध्यक्ष नवीन पनवेल विभाग किशोर कदम, अध्यक्ष कामोठे शहर विभाग  अरुण जाधव ,अध्यक्ष महिला आघाडी पनवेल शहर  ममताज पठाण,उपाध्यक्ष पनवेल शहर  भारत दाताड ,अध्यक्ष अल्पसंख्यांक सेल पनवेल शहर  आसिफ शेख  ,उपाध्यक्ष महिला आघाडी पनवेल शहर   निशा कोळी ,संघटक पनवेल शहर  समाधान कांबळे ,उपाध्यक्ष नवीन पनवेल विभाग  अशोक कदम  ,सरचिटणीस पनवेल शहर  मयूर गायकवाड ,संघटक पनवेल तालुका  चंद्रकांत वेळासकर, उपाध्यक्ष पनवेल विधानसभा मतदारसंघ  प्रशांत सोनवणे ,संघटक पनवेल विधानसभा मतदारसंघ  अनिल वामने व महिला आघाडीच्या सुमन पाटील व फातिमा या उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top