पनवेल/प्रतिनिधी — लोक कल्याण ग्राहक संरक्षण संस्था महाराष्ट्र राज्य ही संस्था देशभर ग्राहकांचे हितासाठी काम करत आहे. या साठी लोक कल्याण ग्राहक संरक्षण संस्था, महाराष्ट्र राज्य यांच्या रायगड जिल्हाध्यक्ष पदी गौरव गायकवाड यांची निवड करण्यात आली. यावेळी रायगड जिल्यातील सर्व प्रकारच्या खरेदी -विक्रीच्या आणि सर्व विक्री पश्चात प्राप्त होणाऱ्या गैरव्यवहारांच्या तक्रारी बाबत गायकवाड संस्थेच्या वतीने अंमल बजावणी करतील असा विश्वास यावेळी गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.

लोक कल्याण ग्राहक संरक्षण संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिनकर आमकर यांच्या मार्गदर्शनाखाली व अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मोहन स. सालेकर यांच्या नेतृत्वाखाली, रमेश म्हात्रे उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांच्या प्रमुख उपस्थितीत संस्था कार्यालय पनवेल येथे नवनियुक्त पदाधिकारी निवड करण्यात आली.

यावेळी करंजाडे युवकांच्या गळ्यातील तावीज ओळखले जाणारे गौरव सुरेश गायकवाड यांची (उरण,पनवेल, कर्जत, खालापूर) रायगड जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्याचबरोबर खालापूर तालुका अध्यक्षपदी इम्रान खान, खालापूर शहर अध्यक्षपदी सौ. रुपाली प्रकाश गायकवाड तर दिनेश रमेश पवार यांची पाली तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. यावेळी संस्थेचे नावलौकिक वाढवाल तसेच संस्थेचा सक्रियपणे प्रचार आणि प्रसार कराल असा विश्वास यावेळी पदाधिकारी यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
