भारताचे लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने “सेवा समर्पण पंधरवाडा” उपक्रमाअंतर्गत स्वस्थ नारी – सशक्त परिवार अभियान महाआरोग्य शिबीर मोठ्या उत्साहात पार पडले.

या उपक्रमाला मा. नगरसेवक दिलीप पाटील, माँ नगरसेवक अरुणकुमार भगत, जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे, कामोठे शहर प्रमुख सुनिल (भाऊ) गोवारी, सगरभाऊ पाटील प्रतिष्ठान कामोठे, तालुका उप प्रमुख कमलाकर गायकर, युवा सेना उपशहर प्रमुख देविदास गोवारी, उत्तर भारतीय शहर प्रमुख सौरभ साध, उत्तर भारतीय उपशहर प्रमुख कुणाल कौशिक, उपविभाग प्रमुख शेखर कवठणकर, शाखा प्रमुख महादेव दौंड, शाखा प्रमुख सुभाष धावडे, स्वप्निल हाजारे, महिला उपशहर प्रमुख संगिता झावरे, महिला विभाग प्रमुख अलका आंधळे, महिला विभाग प्रमुख सुरेखा गड्डे यांच्यासह शंकरराव चव्हाण शाळेचे चेअरमन चव्हाण सर मुख्याध्यापक सौ स्मिता पनवेलकर आणि मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


या शिबिरात नागरिकांना मोफत आरोग्य तपासणी व सल्ला देण्यात आला. विशेषतः महिलांच्या आरोग्य समस्यांवर तज्ज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन केले.
उपस्थित मान्यवरांनी सांगितले की, “निरोगी महिला म्हणजे निरोगी परिवार, आणि निरोगी परिवार म्हणजेच सक्षम समाज.”


