4k समाचार
उरण दि 29 (विठ्ठल ममताबादे )
केळवणे येथील को.ए.सो. हायस्कूल शाळेने पावसाळी तालुका क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये उल्लेखनीय यश मिळवत गेल्या काही दशकात सर्वोत्कृष्ठ कामगिरी केलेली आहे. या स्पर्धेत शाळेच्या तीन संघांनी अंतिम फेरीत दमदार विजय मिळवून जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी आपली पात्रता निश्चित केली आहे.

अंडर -१४ वयोगटातील मुलींच्या संघाने चावणे विद्यालयावर विजय मिळवला.अंडर -१७ वयोगटातील मुलींच्या संघानेही चावणे विद्यालयाचा पराभव केला.अंडर -१७ वयोगटातील मुलांनी कासारभट इंग्लिश मिडियम स्कूल विरुद्ध निर्णायक सामना जिंकला.या तिन्ही संघांच्या यशामुळे शाळेने सामूहिक स्तरावर तालुक्यात आपली मजबूत छाप सोडली आहे.यासोबतच, तालुका अॅथलेटिक्स स्पर्धा २०२५ मध्येही विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.पूर्वा नवनीत मोकल – ४०० मीटर धावण्यामध्ये प्रथम क्रमांक मिळविला , कु. मुग्धा भास्कर म्हात्रे – ८०० मीटर धावण्यामध्ये प्रथम क्रमांक पटकाविला आहे ,कु. यश विजय ठाकूर – ८०० मीटर धावण्यामध्ये द्वितीय क्रमांक मिळविला आहे.

या सर्व विद्यार्थ्यांच्या यशामुळे शाळेचा क्रीडा क्षेत्रातील आत्मविश्वास व प्रतिष्ठा अधिकच वृद्धिंगत झाली आहे.मुख्याध्यापक रामचंद्र गणा पाटील , क्रीडा शिक्षक अनमोल पगारे, देविदास गागुर्डे व संपूर्ण शिक्षकवृंद, सामाजिक कार्यकर्ते प्रेम म्हात्रे,अमित पाटील यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांना जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
