नवीन बातम्या
साईनगर परिसरात उभारलेल्या पोलीस मदत केंद्राचा लाभ विभागातील नागरिकांना होणार
पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या माध्यमातून ग्रीन पोलीस स्टेशन उपक्रमांतर्गत परिसरात वृक्षारोपण
पनवेल तालुका पोलिसांनी केली दंगा काबू योजनेची रंगीत तालीम
रेल्वेची धडक लागून अज्ञात इसमाचा मृत्यू ; पनवेल तालुका पोलिसांच्यामार्फत नातेवाईकांचा शोध सुरू
‘रयत’तर्फे लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा शनिवारी हृद्य सत्कार‘
गामी बिल्डरच्या बांधकामामुळे पिसार्वे गावाचा नैसर्गिक नाला धोक्यात; माजी सरपंच नंदकुमार म्हात्रे यांचा इशारा
पनवेल एस.टी. डेपो परिसरात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या साठवणूक आणि विक्रीप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल, वाहन जप्त !
विजेच्या समस्येसंदर्भात महाविकास आघाडीच्या नगरसेवकांची वीज वितरण कार्यालयाला धडक
गेल्या दोन महिन्यांपासून महिलेची हत्या करून पसार असलेल्या आरोपीला पनवेल तालुका पोलिसांनी केले गजाआड

खारघर, तळोजा परिसरातील जलपुरवठा होणार सुरळीत; भाजप पदाधिकार्‍यांच्या पाठपुराव्याला यश



4k  सामाचार दि. 16
खारघर(प्रतिनिधी) खारघर आणि तळोजा परिसरातील वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे. या भागातील नागरिकांना दिलासा देणारा निर्णय सिडकोकडून घेण्यात आला असून, येत्या काही दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत होणार असल्याची अधिकृत माहिती लेखी स्वरूपात देण्यात आली आहे. 


  बेलापूर येथील सिडको भवनामध्ये बुधवारी या संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, निर्दोष केणी, विनोद घरत, साजिद पटेल, आशा बोरसे, जगदीश घरत, सचिन वास्कर आणि संतोष पाटील यांनी नागरिकांच्या वतीने पाणी प्रश्नावर सिडको अधिकार्‍यांशी चर्चा केली. या बैठकीला सिडकोचे अधीक्षक अभियंता पी.एम शेवतकर उपस्थित होते. बैठकीदरम्यान तळोजा फेज 1 व 2 तसेच खारघर सेक्टर 23, 27, 30, 34, 35, 36, 39 आणि 40 या भागातील पाणीपुरवठा सुधारण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला. सिडकोने दिलेल्या लेखी पत्रानुसार, नवी मुंबई महानगरपालिकेकडून अतिरिक्त एमएलडी पाणीपुरवठा करण्यासाठी विनंती करण्यात आली आहे. 


हेटवणे धरणातून मिळणार्‍या पाण्याचा पुरवठा वाढविण्यासाठी मागणी नोंदविण्यात आली आहे. खारघर सेक्टर 26 मधील पंप हाउस येथे नवीन पंप बसविण्याचे काम प्रगतीपथावर असून ते पूर्ण झाल्यानंतर पुरवठा अधिक सुरळीत होईल, या निर्णयामुळे खारघर व तळोजा परिसरातील हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. भाजप पदाधिकार्‍यांनी नागरिकांच्या समस्या सातत्याने पुढे मांडत प्रशासनाचे लक्ष वेधले होते. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून, सिडकोने दिलेल्या लेखी पत्रानंतर स्थानिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. 


 याबाबत भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी यांनी सांगितले की, नागरिकांच्या हितासाठी आम्ही गेल्या अनेक दिवसांपासून सिडकोकडे मागणी करत होतो. अखेर सिडकोने सकारात्मक प्रतिसाद देऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्याची हमी दिली आहे. या निर्णयाबद्दल खारघर व तळोजा रहिवाशांनी भाजप पदाधिकार्‍यांचे आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top