नवीन बातम्या
नवी मुंबई-रायगडमध्ये ‘EODR 2.0’चे आयोजन
४० हून अधिक विकासकांचा सहभाग; १,५०० हून अधिक गृहनिर्माण संस्थांना जोडण्याचे उद्दिष्ट
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणरायाचे घेतले दर्शन
ढोल-ताशांच्या गजरात विमानतळावर अवतरली महाराष्ट्राची लोकसंस्कृती
नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणार; आयुक्त  अभिषेक कृष्णा यांच्यासमवेत संघर्ष समितीची यशस्वी बैठक

रिटघर गावाची ‘एक गाव, एक गणपती’ची ५२ वर्षांची अखंड परंपरा
आदिवासी बांधवांसोबत गणेशोत्सवाचा आनंद; महिला, पुरुष व चिमुकल्यांचा सन्मान
महापौर निवासस्थानी चाफेवाडी, फणसवाडीतील नागरिकांच्या हस्ते गणरायाची आरती; क्रिकेट संघांना क्रीडा साहित्याकरिता आर्थिक मदत
५२ महाविद्यालयांचा सहभाग; सी.के.टी. महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेला सुरुवात
एईआरए दर सवलतींमुळे नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवास अधिक स्वस्त होणार
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘ग्रीन गणेशा’ उपक्रमाला सुरुवात; संचालक सोमनाथ मलगर यांचे विशेष पुढाकार आणि मार्गदर्शन

पुष्पक नगरचा प्रचार व प्रसार व्हावा या उद्देशाने दिशा बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या मार्फत पुष्पक नगर प्रॉपर्टी एक्सपो 2025 चे आयोजन

4kNews
पनवेल, दि. 22  ( संजय कदम ) : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बाधित प्रकल्पग्रस्तांसाठी पुष्पक नगर  निर्माण होत आहे. मात्र विमानतळा शेजारी असून सुध्दा पुष्पक नगरचा प्रचार व ज्या प्रकारे प्रचार व प्रसार व्हायला हवा होता तसा झालेला नसल्याने येथील स्थानिक भूमिपूत्र व त्यांच्या सोबत काम करणारे बांधकाम व्यवसायिक यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. या सर्व समस्या सोडविण्यासाठी दिशा बहुउद्देशीय सेवा संस्थेच अध्यक्ष सुनिल काशिनाथ कटेकर यांनी पुढाकार घेवून पुष्पक नगर प्रॉपर्टी एक्सपो 2025 चे आयोजन केले असल्याची माहिती आज काळभैरव मंदिर, आर 3, चिंचपाडा  येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिले .  


      या पत्रकार परिषेदेला बांधकाम व्यवसायिक अनिल सिंघवी , नागेश सुरवसे , सुनिल काशिनाथ कटेकर, संतोष सुतार आदी मान्यवर उपस्थित होते . सदर  पुष्पक नगर प्रॉपर्टी एक्सपो 2025 हे २२ ते ३१ डिसेंबर २०२५ दरम्यान रोटरी पनवेल फेस्टिव्हल, कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी , पनवेल येथे करण्यात आले असून पुष्पक नगर हे आगामी काळात सर्वाधिक गतिमान आणि प्रतिष्ठित ठिकाण म्हणून ओळख होणार असून जास्तीत जास्त लोकांनी येथे आपली घरे घ्यावीत यासाठी पुष्पक नगर प्रॉपर्टी एक्सपो 2025 चे आयोजन केले असल्याची माहिती सुनिल काशिनाथ कटेकर  यांनी दिली . 

आगामी काळात सिडकोसह इतर शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून या भागाचा विकास होणार आहे . पुष्पक नगर ही  वेगळी ओळख लोकांना दिसणार आहे . विमानतळापासून हाकेच्या अंतरावर हे नगर असल्याने लोकांना याठिकाणी राहण्यास आवडणार आहे . या भागातील प्रकल्पग्रस्त बांधकाम व्यवसायिक याना बरोबर घेऊन हे पुष्पक नगर प्रॉपर्टी एक्सपो 2025 चे आयोजन केल्याची माहिती अनिल सिंघवी यांनी दिली . तरी जास्तीत जास्त पनवेलवासीय व नवीमुंबई परिसरातील नागरिकांनी या प्रॉपर्टी एक्सपो 2025 मध्ये सहभाग घेवा . असे अहवाहन संतोष सुतार यांनी केले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top