नवीन बातम्या
WordPress.org blog: WordPress 7.0.3 release
वाढदिवसाचे सामाजिक औचित्य! महेश साळुंखे यांच्या पुढाकाराने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
How to Price Your Online Course: One-Time vs Subscription vs Membership
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत भारतीय मजदूर संघाच्या प्रतिनिधींची विविध कामगार प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक संपन्न.
ऑल इंडिया एअरपोटर्स एव्हिएशन एम्प्लॉईज युनियनच्या उपाध्यक्षपदी बाळासाहेब नाईक यांची नियुक्ती
लोकनेते रामशेठ ठाकूर हे समाजसेवेतील ‘हिरा’; त्यांच्या नेतृत्वाने जनार्दन भगत शिक्षण संस्थेने महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवला –  आमदार रविशेठ पाटील
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भागूबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉच्या भव्य मूट कोर्टचे उद्घाटन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त शास्त्रीय संगीताच्या मार्गदर्शनपर प्रात्यक्षिकाने रंगली सुरेल मैफल; विदुषी शुभदा पराडकर यांचे शास्त्रीय संगीतप्रेमी व युवा कलाकारांना मोलाचे मार्गदर्शन
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त बालग्रामला जीवनोपयोगी वस्तूंची मदत
रुचिता लोंढे-समेळ यांचा स्तुत्य उपक्रम; ‘फुलं-हारांऐवजी लोकोपयोगी कामात सहभागी व्हा’ या आवाहनाला प्रतिसाद
पनवेलचे लोकप्रिय आमदार मा. श्री. प्रशांत ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात (अधिकारप्रदत्त स्वायत्त) शनिवार, दि. ८ ऑगस्ट रोजी ‘भव्य रोजगार मेळावा २०२६’चे आयोजन

न थांबता समाजाची सेवा करणाऱ्या सरस्वती काथारा

4kNews दि. 22
पनवेल :  निवडणुकांचं पडघम आटोपल्यानंतर राजकारणातून अलिप्त होणारी माणसं आपण पाहिली असतील. पण काही माणस सर्वसामान्य जनतेची काम करण्यात कायम दंग झालेली असतात. २०१७ मध्ये पनवेल महानगरपालिकेच्या निवडणूकीनंतर समाजाशी नाळ जोडल्याने गेली आठ वर्ष अविरतपणे निःस्वार्थीपणे काम करणाऱ्या सरस्वती काथारा ह्यांना लहानपणापासूनच राजकारणाचे बाळकडू वडिलांकडून मिळाले. वडिलांचा राजकीय प्रवास जवळून पाहिल्याने समाजाची सेवा करणे, विकासकामे,गोरगरीब, अडला नडल्यांना मदत करणे, महिलांच्या खांद्याला खांदा लावून त्यांचे प्रश्न सोडविणे, तर समाजाची सेवा करण्याची कल्पकता राजकारणातील डावपेच अगदी जवळून पाहत आले.


   २१ व्या वर्षात राजकीय प्रवासाला सुरुवात केली. शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात असताना अनेक पदांचा पदभार त्यांनी स्वीकारला. आता भाजपमध्ये सक्रिय झाल्यानंतर सामाजिक हितासाठी कामांचा झंजावात सुरूच आहे. २०१७ मध्ये त्यांनी पनवेल महानगरपालिकेची निवडणूक लढवली होती. पण त्यांच्या पदरी निराशा झालेली पाहायला मिळाली. निवडणुकीतील पराभव पाहिल्यानंतर बरीचशी मंडळी समाजाची सेवा करण्यापासून वंचित होताना दिसतात. पण पराभवानंतरही गेली आठ वर्ष त्या जनतेच्या सानिध्यात आहेत. राजकारण आणि समाजकारण या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात, राजकारणामध्ये राहूनही समाजकारण करणारी माणसे निराळीच. सरस्वती काथारा ह्या सर्व अडचणींवर मात करत मागील आठ वर्षापासून अविरतपणे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, कला, क्रीडा क्षेत्रात कार्यरत असताना नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या हॉस्पिटल, पोलीस स्टेशन, शाळेच्या प्रवेशासाठी सहकार्य करणे, शालेय विद्यार्थ्यांना मदतीचा हात म्हणून शैक्षणिक साहित्यांचे वाटप करणे, 

प्रभागातील युवकांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहित करणे, महिलांसाठी मोफत देवदर्शन, हळदी कुंकवाचे आयोजन, महिलांच्या मनोरंजनासाठी खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे आयोजन करणे, सार्वजनिक गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दहीहंडी, क्रिकेटच्या स्पर्धा, अडल्या नडल्यांना आर्थिक मदतीचा हात, स्वयंरोजगारासाठी महिलांना प्रशिक्षण शिबिर, महिला सशक्ति करण्यासाठी पुढाकार असे विविध प्रकारचे कार्यक्रम समाजाच्या हितासाठी त्या गेल्या अनेक वर्षापासून करत आहेत. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून समाजाची सेवा करणे समाजासाठी धावून जाणे त्यांनी कधीच सोडले नाही. गोरगरिबांच्या खांद्याला खांदा लावून सरस्वती काथारा त्यांच्यासोबत राहिल्या आहेत. अशी दुर्मिळ माणसं पाहायला मिळतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top