4k समाचार दि. 20
पनवेल तालुका दक्षिण मंडल अंतर्गत गुळसुंदे पंचायत समिती युवा मोर्चाच्या चिटणीसपदी स्वप्निल चौलकर यांची नियुक्ती करण्यात आली असून आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, जीवन म्हात्रे, अमित जाधव, माजी पंचायत समिती सदस्य जगदीश पवार, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे, दक्षिण मंडल अध्यक्ष मंगेश वाकडीकर, गुळसुंदे जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष अविनाश गाताडे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
