नवीन बातम्या
पनवेल जिल्हा काँग्रेसतर्फे भारत रक्षक BLA-2 SIR प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न
*कळंबोलीत पोलिओ लसीकरण दिन साजरा; नगरसेविका सौ. बायजा बारगजे यांच्या हस्ते उद्घाटन*
आमदार विक्रांत पाटील जनसेवा कार्यालयात ‘मन की बात’ कार्यक्रमाचे सामूहिक श्रवण
सहाय्यक पोलीस आयुक्तपदी नितीन ठाकरे यांची पदोन्नती; बाळासाहेब पाटील व आमदार विक्रांत पाटील यांच्याकडून सत्कार
आंतरराष्ट्रीयअंमली पदार्थ नशा-मुक्ती दिनानिमित्त पनवेलमध्ये जनजागृती कार्यक्रमपनवेल,
फक्त रोख रक्कम चोरणारा सराईत गुन्हेगार पनवेल शहर पोलिसांच्या ताब्यात
शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटपाचा उपक्रम 1 जुलै रोजी
पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या वपोनि पदी बाळा कुंभार तर उरण पोलीस ठाण्याच्या वपोनि पदी पृथ्वीराज घोरपडे
पनवेल शहर वाहतूक शाखेच्या सतर्कतेमुळे केरळमधून चोरीस गेलेली दुचाकी हस्तगत

प्रवाशांची अनेक दिवसांची मागणी मान्य.
नेरुळ, बेलापूर वरून उरणसाठी रात्री ११ वाजताची शेवटची रेल्वे सेवा सुरु करावी, प्रवाशांची मागणी.

4kNews दि. 8

उरण दि  8 (विठ्ठल ममताबादे )
गेली अनेक दिवसापासून उरण ते नेरुळ व उरण ते बेलापूर या मार्गांवर रेल्वेच्या फेऱ्या वाढविण्यात यावेत अशी मागणी प्रवाशी वर्ग, नागरिक, ग्रामस्थ तसेच विविध सामाजिक संस्था सामाजिक संघटनानीं केली होती.त्या मागणीला आता यश आले आहे. रेल्वेच्या फेऱ्या वाढविण्यात यावेत यासाठी आमदार महेश बालदी, भाजपचे युवा नेते प्रितम म्हात्रे यांनी पाठपुरावा, पत्रव्यवहार केला होता. त्यांच्या पाठपुराव्याला, पत्रव्यवहाराला आता यश आले आहे.या निर्णयामुळे आता प्रवाशी वर्गांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे. उरण ते नेरुळ व उरण ते बेलापूर या मार्गावर पहाटे ५ वाजल्यापासून रेल्वे सुरु करण्यात यावे व नेरुळ व बेलापूर येथून उरणला येण्यासाठी शेवटची रेल्वे रात्री ११ वाजताची असावी अशी मागणी प्रवाशी वर्गांनी केली आहे.




महाराष्ट्राच्या प्रगत आणि सर्वसमावेशक विकासासाठी सतत प्रयत्न करणारे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या पाठपुराव्यानंतर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णवजी यांनी नेरुळ–उरण–नेरुळ (4 फेऱ्या), बेलापूर–उरण–बेलापूर (6 फेऱ्या) या अतिरिक्त लोकल सेवा सुरू करण्यास मंजुरी दिली आहे.तसेच तरघर आणि गव्हाण येथे नवीन रेल्वे स्टेशन स्थापन करण्यास मान्यता दिली आहे.या निर्णयामुळेमुंबई नवी मुंबई, रायगड जिल्ह्यातील  वाहतूक व्यवस्थेला नवे बळ मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top